[केंदूर येथे बीट पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन]
प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
शिक्रापूर जिल्हा परिषद प्राथमिक विभाग पुणेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडावी यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून केंद्र स्तर,बीट स्तर,तालुकास्तर आणि नंतर जिल्हास्तर अशा स्वरूपाच्या स्पर्धा घेतल्या जातात या स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो यासारखे सांघिक खेळ तर धावणे, गोळा फेक,थाळीफेक,लांब उडी या वैयक्तिक खेळासह वक्तृत्व स्पर्धा,भजन स्पर्धा,प्रश्नमंजुषा,नृत्य स्पर्धा चे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा केंदूर या ठिकाणी करण्यात आले होते या बीटस्तरीय स्पर्धेसाठी शिरूर तालुका पंचायत समितीच्या उपसभापती सविताताई प-हाड,केंदूरनगरीचे प्रथम नागरिक सरपंच अमोल थिटे,मा.सरपंच सूर्यकांत थिटे,मा.सरपंच भरत साकोरे,मा सरपंच अभिजीत साकोरे,उपसरपंच भाऊसाहेब थिटे,अध्यक्ष संपत सुपेकर,उपाध्यक्ष फक्कड थिटे व मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धांचे नियोजन विस्तार अधिकारी एल डी काळे केंद्रप्रमुख दत्तात्रय शिंदे,केंद्रप्रमुख विश्वास सोनवणे,केंद्रप्रमुख सुनील जोशी,मुख्याध्यापक जयसिंगराव न-हे,मंगेश गावडे,किसनराव हरपुडे,अंजना चौधरी,मोहन विधाटे,सुरेश खैरे,सुभाष कोरडे,हरिप्रसाद पुंडे,प्रदीप थोरात,काळे सर,पडवळ मॅडम,मंदाकिनी थिगळे, वैशाली थिटे,सूर्यकांत डफळ बाळासाहेब शिंदे,रोहिदास घोडेकर,पाटील डफळ,नरवडे सर,गायकवाड सर,संपत कांदळकर,दत्तात्रय घाडगे,विश्वास साकोरे, रोहिणी नाईकरे व पाबळ,केंदूर, कान्हूर मेसाई केंद्रातील शिक्षकांनी केले. स्पर्धांचे परीक्षण प्रा.जितेंद्रकुमार थिटे,पुंडे सर,गवळी सर दाभाडे सर व जिजाबाई थिटे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाण विधाटे तर आभार विजयराव थिटे यांनी मानले. *स्पर्धेचा निकाल* *कबड्डी स्पर्धा* लहान गट [मुले] जि.प.प्राथमिक शाळा केंदूर लहान गट [मुली] जि.प.प्राथमिक शाळा महादेववाडी मोठा गट [मुले] जि प प्राथमीक शाळा केंदूर मोठा गट [मुली] जि प प्राथमीक शाळा केंदूर *खो-खो स्पर्धा* लहान गट [मुले] जि प प्राथमीक शाळा केंदूर लहान गट [मुली] जि प प्राथमीक शाळा केंदूर मोठा गट [मुले] जि प प्राथमीक शाळा खैरेनगर मोठा गट [मुली] जि प प्राथमीक शाळा खैरेनगर *५० मीटर धावणे* लहान गट [मुले] स्वराज मल्हारी निर्मळ लहान गट [मुली] ज्ञानेश्वरी सोमनाथ पावशे *१०० मीटर धावणे* मोठा गट [मुले] खुशाल अर्जुन वाघ मोठा गट [मुली] अनन्या सुरेश खैरे *गोळा फेक* मोठा गट [मुले] खुशाल अर्जुन वाघ मोठा गट [मुली] राधा अमोल सोनवणे *थाळी फेक* मोठा गट [मुले] खुशाल अर्जुन वाघ मोठा गट [मुली] आदिती संतोष येवले *उंच उडी* लहान गट [मुले] अंकुश सुनील राय लहान गट [मुली] ऐश्वर्या दत्ता धुमाळ मोठा गट [मुले] खुशाल अर्जुन वाघ मोठा गट [मुली] अनन्या सुरेश खैरे *लांब उडी* लहान गट [मुले] रुद्र किरण साकोरे लहान गट [मुली] नूतन योगेश रामाणे हज्ञमोठा गट [मुले] खुशाल अर्जुन वाघ मोठा गट [मुली] श्रावणी दत्तात्रेय गायकवाड
*प्रश्नमंजुषा स्पर्धा*
लहान गट जि प प्राथमीक खैरेनगर मोठा गट जि प प्राथमिक खैरेनगर
भजन स्पर्धा* लहान गट जि प प्राथमीक शाळा महादेववाडी मोठा गट जि प प्राथमीक शाळा केंदूर
*वक्तृत्व स्पर्धा* लहान गट रेवती चंद्रकांत थिटे मोठा गट सर्वेश अरुण खैरे
*लोकनृत्य स्पर्धा* लहान गट जि प प्राथमीक शाळा प-हाडवाडी मोठा गट जि प प्राथमीक शाळा केंदूर