नागरिकांना जुलाब,उलट्यांचा त्रास.
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील अत्यंत दुर्गम व आदिवासी भागातील कोपरे गावाची माळेवाडीत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून शिवकालीन टाक्यांतील पाणी अचानक दूषित व खराब झाले असून ते विषारी पाणी पिण्यासाठी मानवालाच नव्हे तर जनावरांना देखील योग्य नाही अशी माहिती कोपरे गावचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष काळू माळी यांनी दिली असून शासनाने वेळेत योग्य ती उपाययोजना करावी अशी येथील गावकऱ्यांनी मागणी केली आहे.
जुन्नर तालुक्यातील हा उत्तरेकडील कोपरे,मांडवे, मुथाळणे,जांभुळशी हा अतिदुर्गम आदिवासी भाग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमृत महोत्सवी काळात देखील मूलभूत जीवनावश्यक गरजांसाठी संघर्ष करताना दिसून येतात आजपर्यंत याभागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न साधारणतः मार्च,एप्रिल महिन्यात भेडसावत होता मात्र यंदा डिसेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण कोपरे गावाची माळेवाडी याठिकाणी पाण्याचे मुख्य पुरवठा करणारे साधन म्हणजे शिवकालीन टाक्यांतील पाणी अचानक दूषित व गढूळ झाले असून हे पाणी पिल्याने स्थानिक नागरिकांना जुलाब व उलट्या व इतर अनेक विकारांनी ग्रासले आहेत यात लहान मुले,वृद्ध,महिला व पुरुष यांचा समावेश आहे.
या विषयी अधिक माहिती देताना काळू माळी म्हणाले की हा जांभुळशीचा भाग खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतला मात्र तरीही पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना झाली नाही.या भागातील शिवकालीन टाक्यातील पाणी विषारी बनले असून या पाण्याची तपासणी आरोग्य विभागाने (सीजीडब्लुबी) या बोर्डाकडून करावी व योग्य उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे.