जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे
सुशिक्षित,गरजू व बेरोजगार युवक युवतींसाठी दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता नारायणगाव पोलीस स्टेशन मीटिंग हॉल येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन.
पुणे ग्रामीण जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी,जुन्नर विभाग श्री रवींद्र चौधर सो. यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशन व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने जुन्नर, आंबेगाव,खेड,शिरूर,अकोले, संगमनेर,तालुक्यामधील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे नारायणगाव पोलीस स्टेशन मिटींग हॉल येथे दिनांक 07/12/2023 रोजी सकाळी 10/00 वा.चे सुमा.आयोजन केले असून सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरुणींसाठी विविध कोर्सचे आयोजन केले आहे.*सदर कोर्समध्ये प्रामुख्याने 1) दुचाकी व चारचाकी गाडी रिपेरिंग,2) हॉटेल मॅनेजमेंट,3)जनरल ड्युटी असिस्टंट( नर्सिंग),4)प्लंबर, 5) इलेक्ट्रिशियन,6)वेल्डर इ.कोर्सचे संपूर्ण मोफत प्रशिक्षण आयोजित केले जाणार असून निवासाची उत्तम सोय तसेच 45 दिवसांचे ट्रेनिंग दरम्यान मोफत चहा,नाश्ता व भोजन तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र व नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तरी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे नाव नोंदणी केलेले सर्व उमेदवार तसेच इतर इच्छुक उमेदवारांनी दिनांक 07/12/2023 रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे भव्य रोजगार मेळाव्यासाठी 45 दिवसाचे ट्रेनिंगला जाण्याचे तयारीने सकाळी ठीक 10/00 वाजता आधार कार्ड, टीसी, जात प्रमाणपत्र, 4 पासपोर्ट साइज् फोटो सह उपस्थित राहावे असे आवाहन नारायणगाव पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले आहे.