राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कर्णधार पदासह संघातील ४ खेळाडूंची निवड!1
प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
भोसे (ता.खेड) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड, यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी विद्यालय केज या ठिकाणी २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यस्तरीय शालेय खो – खो स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे ५ संचालित,मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे,ता.खेड,जि.पुणे प्रशालेने १७ वर्ष वयोगटात पुणे विभागाचे संघाचे प्रतिनिधित्व करताना अंतिम सामन्यात लातूर विभागातील धाराशीव संघाचा १ डाव ६ गुणांनी पराभव करत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकासह सूवर्णपदक पटकावले.
या संघातील भावेश माशेरे,चेतन गुंडगळ,शंकर यादव,तन्मय शेवाळे या ४ खेळाडूंची नाशिक या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या कर्णधार पदाची धुराही संघातील भावेश माशेरे या खेळाडूवर सोपविण्यात आलेली आहे.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतिश गवळी यांनी दिली.
सर्व विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे ५ चे कार्याध्यक्ष मा डॉ गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे,शाळा समितीचे अध्यक्ष सुरेश तोडकर, व्हिजीटर राजीव कुटे,सरपंच विजय काळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य , चेअरमन अशोक कुटे व सर्व संचालक, कनिष्ठ महाविद्यालय समन्वय समिती अध्यक्ष संदिप गांडेकर,समस्त ग्रामस्थ भोसे,खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्ष नितीन वरकड व सर्व सदस्यांनी हार्दिक अभिनंदन केले.या विजयी संघास रोहन सावंत,धीरज दंडवते,रमेश लोणारी, हनुमंत तापकीर,दिनेश गुंडगळ, वैभव लोणारी,संतोष गांडेकर व सर्व शिक्षक वृंद यांनी मार्गदर्शन केले.*सूवर्णपदक प्राप्त राज्यस्तरीय खो-खो खेळाडू*चेतन गुंडगळ,भावेश माशेरे,शंकर यादव,ओंकार लोणारी,तन्मय शेवाळे, सोहम गांडेकर,शुभम गांडेकर, सिद्धांत लोणारी,पार्थ कुटे,आशुतोष गायकवाड ,अविष्कार लोंढे,ओम वाघमोडे,साहिल दंडवते,आरमान अन्सारी,आदित्य माशेरे.