.जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर

आज दिनांक -०४ डिसें २३ रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान मौजे ओतूर पाथरटवाडी येथील समीर घुले हे आपल्या पत्नी अश्विनी समीर घुले वय वर्ष- २६ समवेत आपल्या मोटरसायकल वरून ओतूर येथे जात असताना कॅनॉल लगत असलेल्या उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून किरकोळ जखमी केले अशी माहिती मिळाली.

माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे वनपाल ओतूर सुधाकर गीते,वनरक्षक विश्वनाथ बेले व फुलचंद खंडागळे यांचे समवेतविशाल घुले,सुधाकर घुले,अमोल गीते,अजय मालकर यांनी जागेवर जाऊन पाहणी करून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे नेऊन उपचार करून पुढील उपचारासाठी जुन्नर येथे नेण्यात आली ग्रामस्थांच्या मागणीनुसार कॅनॉल लगत पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ओतूर परिसर हा बिबट प्रवण क्षेत्रात येत असल्याने ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर लाईट लावणे ,समूहाने फिरणे,सोबत बॅटरी व मोबाईलवर गाणी वाजवणे आपले पशुधन सुरक्षित गोठ्यात ठेवणे तसेच बाहेरून आलेल्या मजुरांना व ऊसतोड मजूर यांना सुरक्षित निवाऱ्याची तसेच लाईटची व्यवस्था करण्यात यावी असे आवाहन वनविभागाकडुन करण्यात येत आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button