शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर- हवेली भारतीय जनता पार्टी पदाधिकारी नियुक्ती समारंभ व कार्यकर्ते मेळावा नुकताच पार पडला यावेळी नियुक्ती कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. या नवीन कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम हवेली तालुक्यातील श्रेयस मंगल कार्यालय केसनंद फाटा वाघोली येथे पार पडला.
यावेळी शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी चिटणीस पदी शरद ओव्हाळ यांची निवड करण्यात आली असून त्याच्या नियुक्तीचे पत्र माननीय.चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, माजी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रदिपदादा कंद, भाजप चे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप आबा सातव, शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, हवेली तालुका अध्यक्ष शामराव गावडे, संदीप आप्पा भोंडवे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. निवडी दरम्यान शरद ओव्हाळ यांनी बोलताना सांगितले की ज्याप्रकारे याअगोदर पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करत होतो त्यापेक्षा अधिक प्रमाणात पक्ष संघटनेसाठी वेळ देऊन वाडी, वस्तीवर पक्षाचे कार्य पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळीमाननीय.चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, माजी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रदिपदादा कंद, भाजप चे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप आबा सातव, शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, हवेली तालुका अध्यक्ष शामराव गावडे, संदीप आप्पा भोंडवे, रोहिदास उंद्रे, रामभाऊ दाभाडे, रोहित खैरे, राहूल गवारे, संतोष काळे, गणेश कोळपे, गोरख धुमाळ,शिंदोडी चे सरपंच अरुण खेडकर इंद्रभान ओव्हाळ, सुदाम धावडे, दत्तात्रय पोपळघट, रमेश थोरात, व इतर मित्र परिवार आदी उपस्थित होते.