जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील प्राचीन परंपरा आहे. उदापुर हे अतिप्राचीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मुख्य सज्जाचे गाव असून या गावचे ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव मंगळवार दिनांक ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती श्री काळभैरनाथ भजन मंडळ व श्री गणेश मित्र मंडला आणि समस्त ग्रामस्थ उदापुरकर यांनी दिली.
श्री काळभैरवनाथ मंदिर भजन मंडळी,श्री गणेश मित्रमंडळ भैरवनाथ नगर व समस्त ग्रामस्थ उदापुर, मुबंईकर,पुणेकर मंडळी तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त उत्सव विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत यामध्ये मंगळवार दि:-०५ डिसें २३, रोजी सकाळी ०८ ते ०९ मांडव डहाळे व श्रींची मिरवणूक सकाळी०९ ते १० श्रींचा अभिषेक,सकाळी १० ते १२ ह.भ.प.विष्णू महाराज केंद्रे यांचे देव जन्माचे हरिकीर्तन,दुपारी ०१ ते ०२ वाजता महाप्रसाद,दुपारी ०२ ते ०४ वाजता सत्यनारायण महापूजा,सायं ०६ ते ०७ हरिपाठ रात्रौ ०९ नंतर श्री काळभैरनाथ भजन मंडळ व रामकृष्ण हरी भजन मंडळ यांचा श्री हरी जागर होईल.वर्षभरात विविध उत्सव केले जातात.
यावेळी उदापुर आणि परिसरातील सर्वच भाविकांनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व सकाळी येताना मांडव डहाळे घेऊन यावे असे आवाहन श्री काळभैरनाथ भजन मंडळ,श्री गणेश मित्रमंडळ भैरवनाथनगर व समस्त ग्रामस्थ उदापुर, मुंबईकर,पुणेकर मंडळी यांनी केले आहे.