जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
ट्रेसेबल गिविंग फाउंडेशन हॉंगकॉंग या सेवाभावी संस्थेच्या वतीने माळशेज पट्ट्यातील आदिवासी भागातील सितेवाडी ता:-जुन्नर येथील शितळेश्वर माध्यमिक विद्यालय व त्याच शाळेचे मुख्याध्यापक संतोष हांडे यांची उत्कृष्ट शाळा व उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून निवड करण्यात आली असून लवकरच या सेवाभावी संस्थेतर्फे या विद्यालयात भेट दिली जाणार आहे.
रविवार दि.०३ डिसेंबर रोजी रा.प.सबनीस विद्यामंदिर नारायणगाव येथे ट्रेसेबल गिविंग फाउंडेशन हॉंगकॉंग यांनी जुन्नर व अहमदनगर मधील एकूण ३८ माध्यमिक शाळांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती.या सर्व शाळांमधून माळशेज पट्ट्यातील आदिवासी भागातील सितेवाडी येथील शितळेश्वर विद्यालयाची उत्कृष्ट शाळा आणि मुख्याध्यापक म्हणून संतोष हांडे निवड करण्यात आली. तसेच या सितेवाडी शाळेला इ.८वी आणि ९ वी वर्गांसाठी २एलसीडी प्रोजेक्टर डिसेंबर अखेरपर्यंत मिळणार आहे ट्रेसेबल गिविंग फाउंडेशन हाँगकाँग या सेवाभावी संस्थेच्यावतीने यापूर्वी आदिवासी भागातील करंजाळे (ता. जुन्नर) येथील न्यू इंग्लिश स्कूलला कॉम्प्युटर लॅब व ई-लर्निंग क्लासरूम मिळाली असल्याने याचा फायदा ग्रामीण आदिवासी दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना निश्चित होईल असे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा मालती हांडे यांनी केले.