जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
माळशेज पट्टयात महत्वाची ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळविलेल्या उदापुर ता:-जुन्नर येथे रविवार दि:- ३ डिसेंबर हा दिवस अपंग दिन म्हणून साजरा करण्यात आला,या दिवशी उदापूर ग्रामपंचायतीच्या वतीने उदापूर गावातील सर्व दिव्यांग, अपंग ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला.यावेळी अंध असतानाही वारकरी संप्रदायामध्ये मोलाचे योगदान देणारे प्रकाश महाराज भास्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामसेवक मच्छिंद्र कवडे यांनी दिव्यांगांसाठी शासनाच्या आणि ग्रामपंचायतच्या विविध योजनांची माहिती देऊन त्याबद्दल मार्गदर्शन केले.अंध,अपंग नागरिक आपल्या परिने विविध सामाजिक कार्यातूनआपली प्रगती करीत असतात. त्यामुळे त्याचे सामाजासाठी मोलाचे सहकार्य असते. या कार्यक्रमासाठी उदापूरच्या उपसरपंच जयश्रीअमुप, माजी उपसरपंच डॉ.पुष्पलता शिंदे,ग्रामपंचायत सदस्यचैत्राली शिंदे,विनोद भोर, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे,शरद शिंदे,प्रकाश भास्कर,निखिल शिरसाट,गणेश शिंदे,सखाराम शिंदे, ग्रामसेवक मच्छिंद्र कवडे, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. अपंग सहायता दिनाच्या निमित्ताने उदापुर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सचिन आंबडेकर यांनी बनकरफाटा येथे सखाराम शिंदे व रेखा शिंदे या अपंगांना माजी सैनिक दिलीप आरोटे यांचे शुभहस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले यावेळी महात्मा फुले पतसंस्था व्यवस्थापक देविदास शिंदे,ग्रामविकास मंडळ उदापुरचे सहसचिव शशिकांत शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.