शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
भारतीय जनता पार्टी पदाधिकारी नियुक्ती समारंभ व कार्यकर्ते मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन श्रेयस मंगल कार्यालय केसनंद फाटा वाघोली येथे दिनांक 3 रोजी वार रविवार सायंकाळी 6 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका व हवेली तालुका कार्यकारणी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली.
यावेळी शिरूर तालुक्यातील गुनाट येथील पांडुरंग (गणेश )कोळपे यांची शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्षपदी मा.श्री.चंद्रकांत दादा पाटील मंत्री उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य , प्रदीप दादा कंद, माजी आमदार बापूसाहेब पठारे, आबासाहेब सोनवणे,संदीप आप्पा भोंडवे, शामराव गावडे यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.भाजपच्या माध्यमातून पांडूरंग (गणेश) कोळपे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारण आणि समाजकार्यात सक्रिय आहेत, शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र दत्त देवस्थान गुनाट या गावच्या सरपंच पदी धुरा देखील त्यांनी संभाळली आहे. त्यांनी आपल्या सरपंचकीच्या कार्यकालामध्ये अनेक गरजू व्यक्तींना मदत करण्याचे काम त्यांनी केले,निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचीत उपाध्यक्ष कोळपे यांनी सांगितले की माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने शिरूर तालुका उपाध्यक्ष पदाचे काम करण्याची संधी दिली आहे या संधीचे सोने करत पुढील काळात शिरूर तालुक्यातील अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून स्थानिकांना रोजगार मिळून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने ही जबाबदारी यशस्वी पार पाडेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माननीय.चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, माजी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रदिपदादा कंद, भाजप चे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप आबा सातव, शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, हवेली तालुका अध्यक्ष शामराव गावडे, संदीप आप्पा भोंडवे, रोहिदास उंद्रे, रामभाऊ दाभाडे, रोहित खैरे, राहूल गवारे, संतोष काळे,गुनाट चे सरपंच सचिन दादा कोळपे, उपसरपंच गोरक्ष धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गव्हाणे, रामदास काकडे, बूथ प्रमुख भाऊसाहेब गवारे, बापू शेठ पारखे, आप्पा सो कोळपे सर, भागचंद कोळपे आदी उपस्थित होते.