प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
दि. 3 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण ज्ञान प्रबोधनी (यशदा)पुणे या ठिकाणी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.यामध्ये ग्रामशिलेदारांचा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा,आदर्श ग्रामसेवक,आदर्श शिक्षक,आदर्श सरपंच यांचा खासदार श्रीकांत शिंदे तसेच पद्मश्री पोपटराव पवार,मा.सुनील चव्हाण साहेब भारतीय प्रशासन सेवा,डॉ.शैलेंद्र देवळाणकर संचालक उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य,पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे साहेब मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके,आमदार अभिमन्यू पवार,आमदार कृष्णा गजबे तसेच महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,उपाध्यक्ष विकास जाधव यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला. राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये २५ पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये ३शिक्षकांचाही समावेश करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयातील सोमनाथराव बबन भंडारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सरांच्या २८ वर्षाच्या कालावधीत विद्यार्थी हित म्हणून विद्यालयाची गुणवत्ता,भौतिक सुविधा,विविध सामाजिक उपक्रम, शाळालाबाह्य मुलांना प्रवाहात आणणे,शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी सोडवणे या अशा अनेक कार्यामुळे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने सरांच्या कार्याची दखल घेतली. सरांना आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते आज महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचा पुरस्कार मिळाल्याने सर्व ग्रामस्थ,संस्थेचे पदाधिकारी व पुणे जिल्ह्यातील शिक्षक वर्ग व विद्यार्थीनी सरांचे कौतुक केले आहे.