शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
२४ वा वर्धापन दिन पुणे जिल्हा पक्षीय कार्यालयामध्ये क्रांतीज्योत महात्मा ज्योतिबा फुले पद्मभूषण स्व. रामविलासजी पासवान साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार व मानवंदना करून लोक जनशक्ती पार्टीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळेस पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी सर्व पदाधिकारी व पक्षीय कार्यकर्त्यांना संघटन व पक्षवाढीसाठी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केलेजनशक्ती मजदूर सभा लेबर सेल प्रदेशाध्यक्ष शरद टेमगिरे यांनी सर्व घटकातील कामगारांनसाठी सरकारी योजना व कामगारांचे अधिकार यावरती मार्गदर्शन केले कृष्णा पवार व अमर पुणेकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्यायावेळेस प्रदेशाध्यक्ष जन्मदूर सभा लोक जनशक्ती पार्टी यांच्यावतीने पार्टीच्या २४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते संदीप ढाकूलकर यांचा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट,प्रदेशाध्यक्ष शरद टेमगिरे,प्रदेश सचिव अमर पुणेकर,प्रदेश सरचिटणीस कृष्णा पवार,लीगल सेल अध्यक्ष ॲड. अमित दरेकर,वडगाव शेरी मतदार संघाचे अध्यक्ष.संतोष भाऊ पिल्ले,पुणे शहर कार्याध्यक्ष रंजीत सोनावळे,प्रहार पुणे जिल्हा कामगार सरचिटणीस संदीप ढाकुलकरसामाजिक कार्यकर्ते आबा गिलबिले,सौ योगिता साळवे जे,सौ कुसुम दहिरे ,व इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेपुणे जिल्हा प्रवक्ते निलेश जगताप यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.