(ओतूर येथील अतिक्रमणांवर कारवाई.)
जुन्नर प्रतिनिधी: रवींद्र भोर
ओतूर,ता:-जुन्नर येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या मदतीने जुने बसस्थानक परिसरात असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आता मोकळा श्वास घेणार कारण या सरकारी दवाखानाच्या समोरील चौकातील अतिक्रमणांवर ग्रामपंचायत ओतूरने धडक कारवाई केली. ओतूर शहराचा मुख्य चौक असलेल्या जुने बसस्थानक परिसरात फळे,भाजीपाला व्यावसायिकां- बरोबरच या चौकातील पत्रा शेडच्या ९ गाळेधारकांनी आपल्या गाळ्याच्या शटरच्या पुढे पत्रे टाकूनरस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात शेड वाढवल्या होत्या.त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा तर निर्माण होत होताच, परंतु हा चौक आहे की नाही हे देखील कळत नव्हतेयाच चौकात नव्याने होत असलेल्या ग्रामीण रुग्णा लयाचे मुख्य प्रवेशद्वारही असल्याने रूग्णालयात रुग्णवाहिका व इतर वाहने ये जा करण्यासाठी हा चौक मोकळा होणे गरजेचे होते.ग्रामपंचायतीकडून या चौकातील अतिक्रमणांवर हातोडा वापरून हा चौक मोकळा केल्याने नागरिकांकडून स्वागत केले असून असेच सर्व शहरातील अतिक्रमणे काढून टाकावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. या कारवाईवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले,माजी पंचायत समिती सभापती विशाल तांबे,सरपंच छाया तांबे,उपसरपंच प्रशांत डुंबरे,ग्राम– पंचायत सदस्य राजेश वाकर,प्रेमानंद अस्वार, गोरक्षनाथ फापाळे,संचित फापाळे,आशिषकुमार गोंदके,मनीषा वारे,वैशाली ताजवे,वनिता बटवाल, रंजना डुंबरे,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वनघरे, अनिल डुंबरे, शशिकांत डुंबरे,नितीन पन्हाळे,जयराम तांबे,राजेंद्र ढोबळे,कैलास पन्हाळे,दत्तात्रेय डुंबरे, धनंजय ढमाले व इतर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नरेंद्र गोराणे,बाळशीराम भवारी,भरत सूर्यवंशी व इतर पथक तैनात होते.मात्र ज्या लोकांकडून अतिक्रमण झाले असे ग्रामपंचायतचे म्हणणे आहे त्या लोकांचा पोटापाण्याची आवश्यक सोय करून द्यावी किंवा आहे त्या उर्वरित जागेत योग्य ते गाळे उभारून द्यावेत.