जुन्नर प्रतिनिधी.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर पिकांचे पंचनामे लवकरात लवकर करून तो अहवाल तहसीलदार प्रांत आणि जिल्हाधिकारी यांना सादर करावा त्याचप्रमाणे तालुक्यात द्राक्ष केळी कांदे त्याचप्रमाणे पश्चिम पट्ट्यात भात शेतीच्या सर्वात जास्त नुकसान झालेले असून त्याची पाहणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन करावी या मागणीसाठी काल जुन्नर तालुका युवा आघाडी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी जुन्नर या ठिकाणी तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस सो यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली राजुरी मध्ये गारपिटीने नुकसान झालेल्या पांडुरंग मारुती हाडवळे यांच्या 17 एकर बागेचे अतोनात नुकसान झालेले असून द्राक्ष बागेला सर्वात जास्त खर्च उत्पन्नासाठी येत आहे हा सर्व खर्च द्राक्ष उत्पादक त्या ठिकाणी अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज काढून द्राक्ष पिकवत असतात परंतु या अवकाळी पावसामुळे यावर्षी त्यांना मुद्दल तर मिळणारच नाही परंतु कर्ज काढल्यावर रकमेचे व्याज सुद्धा जाणार नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक फार अडचणीत येणार आहे त्यांना एकरी चार लाख रुपये हा भांडवली खर्च येत असतो तेवढी रक्कम सरकारने त्यांना भरपाई म्हणून द्यावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक पांडुरंग हाडवळे यांनी तालुका शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांनी त्यांच्या बागेला भेट दिली असता त्यांच्याशी संवाद साधताना भांडवली विषयावरती आपली व्यथा मांडली हाच विषय काल तहसीलदार रवींद्र सबनीस साहेब यांची काल प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना सांगितलं असतं त्यांनी हे लवकरात लवकर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आश्वासन त्या ठिकाणी दिले असताना त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये जेवढे कुणबी नोंदी महसूल विभागाला शोध मोहिमेमध्ये मिळालेल्या आहेत त्या सर्व सकल मराठा समाजातील लोकांना कॅम्प घेऊन जातीचे दाखले देण्यात यावा अशी मागणी ही जुन्नर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सचिन थोरवे यांनी केली या मागणीलाही तहसीलदार रवींद्र सबनीस साहेब यांनी दुजोरा दिलेला असून लवकरात लवकर कॅम्प घेऊन हे दाखले करीत करण्याचे आश्वासन या ठिकाणी दिलेले आहे त्याबद्दल थोरवे यांनी तहसीलदार साहेबांचे आभार मानले.