प्रतिनिधी: सचिन थोरवे
नारायणगाव मधील पेठ आळी परिसरात एका वयोवृद्ध महिला चालत घरी जात असताना. महिलेच्या गळ्यामधून अनोळखी इसमाने पाठीमागून येऊन बळजबरीने सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना घडली होती. यामुळे नारायणगाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटने बाबत नारायणगाव पोलीस स्टेशन ला माहिती मिळताच नारायणगाव पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस विनोद धूर्वे, पोलीस जगदीश पाटील, पोलीस केंगले, पोलीस हवालदार साबळे, पोलीस हवालदार कोकणे,पोलीस हवालदार पोपट मोहरे, पोलीस नाईक मंगेश लोखंडे, पोलीस कॉ्स्टेबल शैलेश वाघमारे, पोलीस कॉ्स्टेबल दत्ता ढेंबरे, पोलीस कॉ्स्टेबल गोविंद केंद्रे, पोलीस कॉ्स्टेबल गंगाधर कोतकर पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते यांचे तीन पथके तयार करून सदर घटनास्थळी भेट देऊन सदर परिसरामधील 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेज चेक करून सदर चैन खेचनाऱ्या इसमाची ओळख पटऊन त्याचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊन त्यास 24 तासाच्या आतमध्ये जबरी चोरी केलेल्या मंगळसूत्रासह ताब्यात घेण्यात आले. असून तो विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर गुन्ह्याचा तपास करत असताना नारायणगाव परिसरातील जबरी चोरी, घरफोडी व इतर चोऱ्या करणाऱ्या टोळीचा सुगावा लागल्याने नारायणगाव पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून संशयित इसम नामे 1.तन्मय थोरात वय १९ वर्ष 2.मोहित समाजपती वय १८ वर्ष दोघेही राहणार नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे यांना ताब्यात घेतले असता त्यांनी व त्यांचे इतर साथीदार यांनी मिळून नारायणगाव परिसरात जबरी चोरी, घरफोडी व इतर चोऱ्या केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. असून त्यांचे कडून 2 मोटारसायकल व इतर चोरलेला एकूण 4,16,000 रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. असून जबरी चोरीचे 2 गुन्हे , घरफोडीचे 3 गुन्हे तसेच चोरीचे 3 गुन्हे असे एकूण 8 गुन्हे उघडकीस आणण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.सदर आरोपींना अटक करून मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर येथे हजर केले असता त्यांना मा.न्यायलयाने 3 दिवस पोलिस कोठडी रिमांड मंजूर केली. असून पुढील तपास पोलीस विनोद धुर्वे करत आहेत. सदर कामगीरी बद्दल नारायणगाव पोलीस स्टेशन चे मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तसेच नारायणगावचे ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे.सदरची कामगीरी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे ,उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर ,यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केली आहे.