शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
गुनाट (ता.शिरुर) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संभाजी गाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी अध्यक्ष भुजंगराव करपे यांनी सर्वांना संधी मिळावी म्हणुन पदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या जागेच्या निवडीसाठी संचालक मंडळाची नुकतीच बैठकी पार पडली. या बैठकीत एकमताने गाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी आर.बी. वाळुंज यांनी काम पाहिले.
यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव दिगंबर लोणकर, पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव कोळपे, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सतीश कोळपे, संस्थेचे व्हा. चेअरमन प्रितम काळे, सचिन कोळपे, गोरक्ष धुमाळ, रामदास काकडे, गहिनीनाथ डोंगरे, अनिल करपे, राजाराम वळू, आपासो भगत, रंगनाथ भोरडे, नानासो भगत, सुभाष भैरट, सचिन करपे , सोमनाथ गिरमकर, राजेंद्र कोळपे, तेजस भगत, हनुमंत सोनवणे आदी उपस्थित होते. “रब्बी हंगामासाठी सभासदांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अॅड् अशोक बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन संभाजी गाडे यांनी सांगितले”.