प्रतिनिधी: सचिन थोरवे
: डुंबरवाडी ता. जुन्नर जि. पुणे येथील टोलनाक्यावरून महेश विश्वास सुपेकर वय 23 वर्ष रा. नांदूर खंदरमाळ ता. संगमनेर जि. अहमदनगर यांचा एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा आयफोन फिफ्टीन प्रो पोलीस स्टेशनला नोंद करून गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून लोकेशन काढले असता. तो जुन्नर या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर मोबाईलचा शोध घेणे कामी एक पथक तयार करून मोबाईलचा शोध घेत असता. सदरचा मोबाईल जुन्नर ता. जुन्नर जि. पुणे या ठिकाणी मिळून आला आहे. त्यानंतर मिळून आलेल्या मोबाईल महेश विश्वास सुपेकर वय 23 रा. नांदूर ता. संगमनेर जि. अहमदनगर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. शक्यतो गहाळ झालेले मोबाईल परत मिळत नाही. परंतु पूणे जिल्ह्यात ओतूर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष अधिकारी सचिन कांडगे यांच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी जनतेला योग्य न्याय मिळतो. त्यामुळे त्या ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाणही कमी झाले. असून गहाळ झालेल्या वस्तू नागरिकांना परत मिळत असल्यामुळे त्यांच्यातील समाधान चेहऱ्यावर पाहायला मिळत असून त्यांच्या कामाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण , अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे ग्रामीण त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस रोहित बोंबले यांनी केली आहे.