जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
मंगळवार दिनांक ७ /११ /२०२३ रोजी तालुका जुन्नर येथील वन विभागाकडून दिनांक ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२३ पक्षी निरीक्षण सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षणाचा व निसर्ग पर्यटनाचा अनुपम उपक्रम राबवला,आकाश गंगेत मुक्त संचार करणारे पक्षी व फुलपाखरे यांचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे.अशा या पशु पक्ष्यांना समर्पित पशु पक्षी सप्ताह साजरा केलाजातो. महर्षी अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस व पक्षी शास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जयंती निमित्ताने दोन्ही दिवसांचे औचित्य साधून पक्षी सप्ताह साजरा केला जातो.
महर्षी अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांनी अरण्यातील पशुपक्षी प्राणी हे सृष्टीचे अनन्य घटक मानून त्यांनी महाराष्ट्रा- तील आदिवासी पाड्यातील पशुपक्षी प्राणी यांचे महत्त्व पटवून देऊन व समजावून लेखन केले.डॉक्टर सलीम अली हे भारतातील आद्य पक्षी शास्त्रज्ञ व पर्यावरणवादी यांनी पशुपक्षी प्राणी यांचा अभ्यास करून या दोन्ही ऋषी व शास्त्रज्ञ यांना वंदन करण्या- साठी ओतूर वनविभागातील मौजे डिंगोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फाळुकदरा शाळेतील मुलांना पशुपक्षी प्राणी फुलपाखरे वनस्पती यांचे मानवी जीवनात असलेले महत्त्व पटवून देणे कामी उपवनसंरक्षक जुन्नर,सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर व वनपरीक्षेत्र अधिकारी ओतूर वैभव काकडे यांचे मार्गदर्शनानुसार वनपाल ओतूर सुधाकर गीते, वनरक्षक सुदाम राठोड व विश्वनाथ बेले यांनी मुलांना पशुपक्षी, प्राणी,वनस्पती व पक्षी निरीक्षणा बरोबरच निसर्ग पर्यटनाचे योग्य मार्गदर्शन करून मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्याचे काम केले.त्या कामी जिल्हा परिषद शाळा फाळुकदरा येथील मुख्याध्यापिका एस. के.भुतांबरे व शिक्षक पी. एन.नलावडे यांनी मोलाचे सहकार्य केले केले.