प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज
को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेच्या 49 व्या वर्धापन दिनानिमित्त सभासद मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीणभाऊ दरेकर आमदार प्रसाद लाड व ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय मिल मजदूर सभागृह परेल मुंबई या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाच्या वेळी सेकंडरी पतसंस्थेच्या नवीन वेबसाईटचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रवीण दरेकर यांनी शासनाच्या वतीने नवी मुंबई येथे सभासदांना हक्काच्या घरासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आणि संस्थेच्या एकूण कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले.उद्योजक आमदार प्रसाद लाड संस्थेच्या शाखा विस्ताराबद्दल संस्थेचे अभिनंदन केले तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांनी पुरस्कारामुळे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या वाढतात त्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवून विद्यार्थ्यांची प्रगती हाच केंद्रबिंदू मानून काम करावे असे मत याप्रसंगी व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव सतीश माने यांनी तर आभार संचालक सचिन नलवडे यांनी मानले अशी माहिती शिरूरचे पालक संचालक तुकाराम बेनके यांनी दिली.
कार्यक्रमासाठी तज्ञ संचालक गुलाबराव गवळे, सचिव किशोर पाटील, खजिनदार सतेश शिंदे, संचालक भाऊसाहेब आहेर प्रमोद देशमुख ,पांडुरंग कणसे, पंकज सिंह ,जगन्नाथ जाधव, वनिता भोसले, वैशाली बेलोसे, जयश्री गव्हाणे इ.संचालक उपस्थित होते.