जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
रोहोकडी ता. जुन्नर येथील शिक्षक अविनाश घोलप यांना सेकंडरी स्कुल एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड,मुंबई यांच्याकडून ४ नोव्हें- बर रोजी परेल (मुंबई) येथील राष्ट्रीय मिल मजूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पदमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार व मुंबै- बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर,आमदार व मुंबै बँकेचे संचालक प्रसाद लाड, साहित्यिक व कवी प्रवीण दवणे,सेकंडरी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,सचिव किशोर पाटील, खजिनदार सतेज शिंदे,संचालक तुकाराम बेनके यांच्यासह सर्व आजी, माजी संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
घोलप हे फुलवडे ता. आंबेगाव येथील श्री नामदेवराव मारुती नंदकर अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षकपदी कार्यरत असून त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात भरघोस अशी मदत करतआदिवासी भागातील अनेक समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले असल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे आयोजकांनी सांगितले.