जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
शनिवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सायं.८.३० वा. दरम्यान पवन वसंत लोहोटे रा.आकाशगंगा सोसायटी, आळे यांनी भ्रमणध्वनीद्वारे सोसायटीच्या ड्रेनेज टाकीमध्ये तरस सदृश्य वन्यप्राणी पडला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर वैभव काकडे यांना दिली असता,तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी, वैभव काकडे, वनपाल आहे- संतोष सांळुंके,वनरक्षक, आहे.कैलास भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथम ड्रेनेज टाकीमध्ये फळी सोडण्यात आली.
तरस फळीच्या आधाराने बसल्यानंतर टाकीत शिडी सोडून त्यास शिडीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.उपवनसंरक्षक जुन्नर.अमोल सातपुते व सहा.वनसंरक्षक -अमित भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील तरस रेस्क्यू पार पडले व तरस वन्यप्राण्यास जीवधन मिळाले वनविभा- गामार्फत तरस वन्यप्राण्यास नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले.