जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर

चिंचोली ता:-जुन्नर या गावाची निवड संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात करण्यात आली आहे,त्यासाठी दिनांक १ नोव्हेंबर रोजी जिल्हा स्तरीय समितीकडून चिंचोली गावची तपासणी करण्यासाठी जिल्हा स्तरीय समितीने गावास भेट दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम पथक व ढोल ताशांच्या गजरात गावात तपासणी समितीने स्वागत करण्यात आले.तसेच सदर समितीने ग्रामपंचायत कार्यालय,ग्रामपंचायत दप्तर तपासणी करून,गावातील मूलभूत सुविधा,कचरा व्यवस्थापन, घंटागाडी उपयोग,प्लॅस्टिक विघटन,सांडपाणी व्यवस्थापन व अडचणी, सार्वजनिक शौषखड्डे, सार्वजनिक शौचालय याची महिती घेवून तपासणी केली,तसेच जिल्हा परिषद शाळा, चिंचोली,जिल्हा परिषद शाळा वाजेवाडी,श्री समर्थ मधुकरराव विद्यालय,चिंचोली,सर्व अंगणवाडी केंद्र या सर्वांमधील स्वच्छतेच्या सुविधा,पाणी पुरवठा,मुलांचे मूलभूत आरोग्याचे प्रश्न याविषयी अधिकारी वर्ग यांनी याची सखोल माहिती घेतली.गावातील नागरिकांबरोबर वैयक्तिक चर्चा करून गावातील सुविधांची माहिती घेतली.

सदर तपासणी टीम चे नेतृत्व श्रीमती प्रमिला वाळुंज,गटविकास अधिकारी पंचायत समितीआंबेगाव यांनी केले.त्यांच्या सोबत हेमंत गरिबे गटविकास अधिकारी जुन्नर,श्रीमती कोल्हे,सहाय्यक गटविकास अधिकारी आंबेगाव,सागर कांबळे,विस्तार अधिकारी, पंचायत समिती आंबेगाव,बाळासाहेब आडके, केंद्रप्रमुख,केंदशाळा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली,पंकज चौधरी,स्वच्छ भारत मिशन समन्वयक आंबेगाव,तडवी साहेब स्वच्छ भारत मिशन समन्वय, जुन्नर,गुजर साहेब शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग,श्रीमती विद्या बांबळे, बचत गट समन्वयक जुन्नर,कवठे साहेब प्राथमिक आरोग्य केंद्र येणेरे इ वर्ग उपस्थित होते.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत चिंचोली गावात मोठ्या प्रमाणात ग्राम स्वच्छता करण्यात आली होती, सर्वत्र सर्व मार्गावर रांगोळी, काढून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.आपल्या गावात येणार जिल्हा स्तरीय समिती येणार याची पूर्व तयारी म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली होती, त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली यांच्या वतीने संपुर्ण गावातील कचरा,प्लॅस्टिक गोळा करून गावाची साफसफाई करण्यात आली.त्यामध्ये पाहिली ते सातवीच्या विद्यार्थ्याना शिक्षकांनी मार्गदर्शन केलें. सदर समितीने कचरा व्यवस्थापन, घंटागाडी उपयोग, ओला कचरा व सुका कचरा याचे व्यवस्थापन, याविषयी चर्चा करून तसेच पुढील काळात होणाऱ्या स्पर्धासाठी मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे मागील तीन वर्षांपासून गावात राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमा- बद्दल माहिती घेतली,त्यामध्यें गावतळे दुरुस्ती, डीएससी या एनजीओ च्या व आयटीसी या कंपनी सीएसआर च्या माध्यमातून तलाव खोलिकरण, साखळी बंधारे दुरुस्ती,वनराई बंधारे, भूमिगत बंधारे, सलग समतल चर, याविषयी महिती घेतली, तसेच चाईल्ड फंड या एनजीओ च्या व सिटी बँक या सीएसआर च्या माध्यमातुन महिला बचत गटातील महिलांना उपजिविकेसाठी प्रत्येकी 300 महिलांना १२ हजार रुपये विनापरतावा देवून त्यांच्या सक्षमीकरण केले व त्यांना प्रशिक्षण दिल्याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामपंचायत युनोच्या नऊ थीम नुसार काम करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

ही तपासणी यशस्वी होण्यासाठी शरदचंद्र माळी,माजी गटविकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर,हेमंत गरीबे साहेब,गट विकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर,स्वच्छ भारत मिशन जिल्हा समन्वयक विक्रम शिंदे,सर्व विस्तार अधिकारी, पंचायत समिती जुन्नर तसेच तडवी,स्वच्छ भारत मिशन समन्वयक जुन्नर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच खंडू काशिद,उपसरपंच इम्रानभाई चौगुले,ग्रामसेवक अर्चना केदारी,ग्रामपंचायत सदस्य छायाताई काशिद,अश्विनीताई खराडे,फसाबई वाजे, राजमाता महिला ग्रामसंघाचे पदाधिकारी व बचत गट सदस्य,गावातील सर्व संस्था प्रतिनिधी,गणेश काशिद, तंटामुक्ती समिती अध्यक्ष एकनाथ काशिद,बिलाल चौगुले,अजित काशिद,बबन वाजे,पोलिस मित्र नवनाथ ताजणे,माजी सैनिक पांडूरंग पवार,इसाक चौगुले, हरीचंद्र काशिद,उल्हास काशिद,बाळु गुंजाळ,अंकुश काशिद,बबन सखाराम काशिद,नाथाशेठ कसबे, गोविंद काशिद इत्यादी ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच सर्व शाळा मुख्यध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button