शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की, मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमातमतदार नोंदणीसाठी जिल्हयातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांनी दि. ४/११/२०२३ व दि. ५/११/२०२३( शनिवार व रविवार) तसेच दिनांक २५/१२/२०२३ ते दि. २६/११/२०२३ या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेषमोहिमांचे आयोजन करण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी साो. पुणे तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सो. पुणे यांनीदिले आहे. त्यास अनुसरुन १९८ शिरुर विधानसभा मतदारसंघामध्ये वरील कालावधीत मतदान केंद्रस्तरीय विशेषमोहिमेचे आयोजन करणेत आलेले असून शिबिरांचे आयोजन करणेत आलेले आहेत.सदर विशेष मोहिमेंतर्गत घेण्यात येणा-या शिबिरांमध्ये दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती, वगळणी इत्यादी बाबत कार्यवाही करणेत येणार आहे. तसेच तृतीय पंथीय यांची वस्ती असणारी ठिकाणे निश्चित करुन व त्यांचा शोध घेवून तृतीय पंथीय व्यक्तींची मतदार नोंदणी करणेची कार्यवाही करणेत येणारआहे. महिला सेक्स वर्कर (FSW), बेघर अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींचा शोध घेवून देखील त्यांची मतदार नोंदणी करणेत येणार आहे. तरी सदर शिबिरांचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घेवून मतदार नोंदणी करणेच्या अत्यंत महत्वाच्या कामामध्ये सहकार्य करावे असे अवाहन श्रीमती स्नेहाकिसवे- देवकाते, मतदार नोंदणी अधिकारी, १९८ शिरुर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी पुणे व श्री. बाळासाहेब म्हस्के, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, १९८ शिरुर विधानसभा मतदारसंघ तथातहसिलदार शिरुर यांनी केले आहे.