जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
करंजाळे ता:- जुन्नर येथील न्यू इंग्लिश स्कूलला कॉम्प्युटर लॅब आणि ई-लर्निंग क्लास रूम मिळाली आहे.हा उपक्रम ट्रेसेबल गिविंग फाउंडेशन हाँगकाँग या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून होत असून,यामुळे ग्रामीण आदिवासी दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा मालती- ताई हांडे यांनी सांगितले.या लॅबमध्ये १० संगणक व १ प्रोजेक्टर असून, याद्वारे ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे स्पर्धात्मक ट्रेनिंग दिले जाणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापक संजय धोत्रे यांनी दिली. या प्रसंगी माध्यमिक विद्यालयातील संगणक लॅबचे उदघाटन शितळेश्वर विद्यालय सितेवाडीचे मुख्याध्यापक संतोष हांडे यांनी तर ई-लर्निंग क्लास रुमचे उदघाटन न्यू इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापक संजय धोत्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळीफाउंडेशनचे इंजिनिअर नरेंद्र दासुजू,आशिक गुप्ता करुणेश कनोजिया,मुलायम यादव,मुख्याध्यापक संतोष हांडे,संजय धोत्रे,सुनीता मोढवे,ज्ञानेश्वर सस्ते, वामन जोगी,इत्यादी शिक्षकवृंद व वनिता गायकवाड शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.