जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर

ओतूर,आळेफाटा,नारायणगाव,जुन्नर,मंचर,घोडेगाव व पुण्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचा सहभाग जगभरातून दररोज सुमारे १० लाख भाविक उपस्थितसर्वांशी प्रेमपूर्ण व्यवहार केल्यास अवघ्या विश्वात शांतीमय वातावरण निर्माण होईल‘‘सर्वांभूती परमात्म्याचे रूप पाहून प्रेमपूर्ण व्यवहार केल्यास विश्वात शांतीमय वातावरण निर्माण होईल’’असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन सत्रामध्ये उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.शांती-अंतर्मनाची या मुख्य विषयावर आधारित हा तीन दिवसीय संत समागम निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा( हरियाणा)येथे आयोजित करण्यात आला ज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून व जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी झाले होते.पुण्या- सह संपूर्ण महाराष्ट्रातून या संत समागमामध्ये सुमारे २ लाख भाविक भक्तगण सहभागी झाले होते ज्यामध्ये सुमारे २० हजार सेवादल स्वयंसेवकांचाही समावेश होता. दररोज सुमारे १०लाख भाविक यासमागमा मध्ये भाग घेत होते. सद्गुरु माताजींनी सांगितले,की विश्वामध्ये जी प्राकृतिक व सांस्कृतिक स्वरुपातील बहुमुखी विभिन्नता आहे ती सुंदरतेचे प्रतीक आहे.वास्तविक या संपूर्ण सृष्टीचा निर्माता हा निराकार परमात्मा असून सर्वांभूती त्याचेच रूप सामावले आहे.या परम तत्वाचा बोध झाल्यानंतर सहजच आपण एकतेच्या धाग्यात गुंफले जातो आणि आपला दृष्टीकोन विशाल होतो. मग आपण संस्कृती,खाणे-पिणे इत्यादिंच्या कारणा- वरुन असलेले समस्त भेदभाव विसरुन सर्वांशी प्रेमपूर्ण व्यवहार करु लागतो.मानवतेच्या नावे संदेश समागमाच्या पहिल्या दिवशी २८ ऑक्टोबर रोजी समागमाच्या शुभारंभ प्रसंगी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मानवतेच्या नावे दिलेल्या संदेशामध्ये म्हटले,की ‘‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण होण्यासाठी प्रत्येक मानवाच्या अंतर्मनात शांती यायला हवी” समर्पणाची गरज पहिल्या दिवशीच्या मुख्य सत्राला संबोधित करताना उपस्थित लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना म्हणाल्या,की ईश्वराच्या प्रति समर्पित मनुष्यच मानवतेची यथार्थ सेवा करु शकतो आणि एक चांगला माणुस बनून अवघ्या विश्वासाठी कल्याणकारी जीवन जगू शकतो.सेवा समर्पणाची भावना अंगीकारल्यानेच जीवनात शांतीसुखाचा अनुभव येऊ शकतो एखादी वस्तु,मान-प्रतिष्ठा किंवा उपाधिच्या प्रति जर आपली आसक्ती जोडली़ असेल तर आपल्या अंतर्मनात समर्पण भाव उत्पन्न होऊ शकत नाही.ईश्वराच्या प्रति कृतज्ञता बाळगा दुसऱ्या दिवशी सत्संगाच्या मुख्य सत्रामध्ये बोलताना की जर आपण शांतीसुखाचे जीवन जगू इच्छित असू तर ईश्वराची ओळख करुन त्याच्या प्रति निरंतर कृतज्ञता व्यक्त करत राहणे नितांत गरजेचे आहे. सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले,की जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्या मस्तकातील ज्या केंद्रातून कृतज्ञतेचा भाव प्रकट होतो त्याच केंद्रातून चिंतेचा भावही उत्पन्न होत असतो. आता कोणता भाव ग्रहण करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे.जर आपण कृतज्ञतेचा भाव धारण करु तर निश्चितच आपल्या अंतर्मनात चालू असलेली चलबिचल हळू हळू संपून जाईल आणि त्या जागी केवळ शांतीसुखाचा निवास होऊ लागेल.सेवादल रैली समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ एका आकर्षक सेवादल रैलीने झाला.या रॅलीमध्ये भारतभरातून व विदेशातूनही हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादलाचे बंधु-भगिनी सहभागी झाले.सेवादल रैलीला संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या,की समर्पित भावनेने केली जाणारी सेवाच स्वीकार्य असते.जिथे कुठेही सेवेची आवश्यकता असेल त्यानुसार सेवेचा भाव मनात ठेवून जेव्हा आपण सेवेमध्ये भाग घेतो तेव्हा ती सेवेची शुद्ध भावनाच महान सेवा गणली जाते. बहुभाषी कवि दरबार:समागमाच्या अंतिम सत्रात‘सुकून-अंतर्मन का’(शांती अंतर्मनाची)या विषयावर आयोजित बहुभाषी कवी संमेलन समस्त भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनून राहिले.या कवी संमेलनामध्ये देश-विदेशातून आलेले जवळपास २५ कवींनी आपल्या सुंदर भावना हिंदी,मराठी,पंजाबी, उर्दू,नेपाळी,इंग्रजी भाषांच्या माध्यमातून सादर केल्या.उल्लेखनीय आहे,की यावर्षी समागमाच्या पहिल्या दिवशी बाल कवी दरबार तर दुसऱ्या दिवशी महिला कवि दरबार देखील आयोजित करण्यात आला होता.ज्याचा भक्तगणांनी भरपूर आनंद प्राप्त केला.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button