मनोज जरांगे पाटील यांना निमोणे येथून पाठिंबा.
निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजबांधव एकवटले असून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी निमोणे (ता. शिरूर) येथे साखळी उपोषण चालू आहे. सकल मराठा समाज बांधवांकडून राजकीय पक्ष नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या या लढ्याला बळकट करण्यासाठी निमोणे येथील मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळेपर्यंत निमोणे गावात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंद करण्यात आल्याचे फलक लावण्यात आले आहे.साखळी उपोषणाचा हा पहिला दिवस आहे.यावेळी यावेळी डॉ. संतोष जाधव, सरपंच संजय काळे, दीपक ढोरजकर, धनंजय काळे, श्यामकांत ढोरजकर, हनुमंत काळे, नानासाहेब काळे , संजय सोनवणे, राजेंद्र काळे, शरद ओव्हाळ, सुरेश काळे ,आबासाहेब थोरात ,अभिषेक सोनवणे, दत्तात्रय जगताप, ओंकार सोनवणे, राहुल खराडे, हर्षवर्धन सोनवणे, तुकाराम वाळुंज उपस्थित होते.