निर्वी प्रतिनिधि : शकील मनियार
मराठा आरक्षणाच्या संघर्षावरून आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे. ज्या युवकांसाठी ही यात्रा काढली, ते युवा अस्वस्थ आहेत. राज्यातील युवक आत्महत्या करत असतील आणि राज्यातील वातावरण संवेदनशील असेल, तर अशा परिस्थितीत यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही. म्हणून आम्ही युवा संघर्ष यात्रा स्थगितीचा निर्णय घेतला असल्याचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.युवा संघर्ष यात्रा चौथ्या दिवशी शिरूर तालुक्यातील निर्वी येथे आली असता या ठिकाणी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. आज संध्याकाळी आमदार संदीप क्षीरसागर, रोहित आर.आर. पाटील, जयदेव गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता अशोक पवार, राष्ट्रवादी कॉग्रसेचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढरे,माजी आदर्श सरपंच तात्यासाहेब सोनवणे, राष्ट्रवादी युवक जिल्हा कॉग्रेसचे स्वप्नील गायकवाड, देवदत्त निकम, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे व राज्यातील विविध जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत रोहित पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.रोहित पवार म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी शासनाला दिलेली मुदत संपल्याने जरांगे २५ ऑक्टोबरला पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तत्पुर्वी २४ पासून युवा संघर्ष यात्रा पुणे येथून सुरू झाली होती. परंतु महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शांतता धोक्यात येऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. म्हणुन यात्रा स्थगितीचा निर्णय घेतला आहे.काल पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे आले, पण त्यांनी मराठा आरक्षणावर एक शब्द काढला नाही. मनोज जरांगेंची प्रकृती ढासळत चालली आहे. ते प्रामाणिकपणे समाजासाठी लढत आहेत. राज्य सरकार मराठा, धनगर समाजाच्या बाबतीत संवेदनशील नाही. आम्ही ही यात्रा युवा हितासाठी काढली. दरम्यान पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अथवा मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणावर काहीही बोलले नाहीत. राज्य पेटले असताना तिकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदी मिळणार यात गर्क आहेत. हे अतिशय दुर्दैवाचे आहे. मराठा आरक्षणाविषयी हे सरकार खरोखरच गंभीर असेल तर आता राज्य व केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी त्यांनी केली.चौकट ः होय मी घाबलोमराठा अंदोलकांनी पुढार्यांना केलेल्या गावबंदीच्या निर्णयामुळे ही यात्रा स्थिगित केली काय? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आ. रोहीत पवार म्हणाले, तुम्हाला वाटत असेल मी घाबरलो तर होय मी घाबरलो. राज्यातील वातावरण अधिक अस्वस्थ होऊ नये, युवकांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी मी घाबरलो असल्याचे ते म्हणाले.