जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
उदापूर ता:-जुन्नर येथील महिला बचत गटाच्या महिलांनी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके यांचा नारायणगाव येथील त्यांच्या कार्यालयात सत्कार केला. उदापूर येथे महिलांचे ४७ बचत गट असून या सर्व बचतगटांचा श्री काळभैरवनाथ महिलाग्रामसंघ करण्यात आला आहे.महिलांचे सक्षमीकरण करण्या- साठी त्यांना व्यवसाय करण्यासाठी व उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी या महिला ग्रामसंघाच्या वतीने उदापूर येथे महिलांसाठी अस्मिता भवन उभारण्यात यावे अशी मागणी या महिलांनी आमदार बेनके यांच्याकडे केली होती.महिलांच्या या मागणीची आमदार बेनके यांनी तत्काळ दखल घेवून या अस्मिता भवनसाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा महिला ग्रामसंघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महिला संघाच्या अध्यक्षा मनिषा संतोष भोर सचिव जानकी संदीप शिंदे,सीआरपी राजश्री महेंद्र वाळेकर, ग्रामपंचायत सदस्या पूनम अविनाश शिंदे,चैत्राली विक्रम शिंदे आदी महिला तसेच ओतूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोषशेठ तांबे,धोलवडचे सरपंच वैभवशेठ नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.