जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर

स्कोडा कार आयशर टेम्पोला मागून धडकली

नगर -कल्याण या राष्ट्रीय महामार्गावरील उदापुर ता:- जुन्नर येथील पुष्पावती नदीजवळ असलेल्या वनविभागाच्या रोपवाटिकेच्या समोरच शुक्रवारी दि:- २० ऑक्टोबर रात्री ८ च्या सुमारास रस्त्याकडेला आयशर टेम्पो (एमएच ०४ एफयू ८२८१) उभा होता.या टेम्पोला भरधाव वेगातआलेल्या स्कोडा या चारचाकीने मागील बाजूने धडक दिली. यामध्ये टेम्पोमागे उभा असलेला टेम्पोचालक मनोहर अप्पाराव इंगळे वय ६१ यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार,ही कार कल्याणच्या दिशेला जात असताना पुष्पावती नदीच्या काठावर वनविभागाची रोपवाटिकेसमोर हा गंभीर जीवघेणा अपघात झाला.या अपघातात रमाबाई बाळू शिद व नाना गोमू शिद दोघेही रा:-सावरीची वाडी, ता:- मुरबाड जि:- ठाणे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, स्कोडा कार एमएच ४६ एपी ९७१९ ही भरधाव वेगात येऊन आयशर टेम्पोला धडकली असून, ती डिंगोरे ता:- जुन्नर गावातील आहे. कारचालक नशेत तरर्र असल्याने अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे.अपघातानंतर कारचालकास जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याने कारचालक खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. अधिक तपासात कारचालक आणि मालक यांची माहिती मिळेल असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेचा तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एस. डी. गेंगजे करीत आहेत.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button