अध्यक्ष
उपाध्यक्ष
शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर तालुक्यातील विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकणाऱ्या पुर्व भागातील निमोणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच पार पडली.मागील दोन वर्षाच्या कार्यकालामध्ये अमोल थोरात यांनी आपल्या अध्यक्षपदाचा कार्यकाल योग्य पद्धतीने पार पाडला या कामाची दखल घेऊन सर्वानुमते पुढील २ वर्षासाठी फेरनिवडीमध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल थोरात यांना परत संधी देण्यात आली व उपाध्यक्षपदी अश्विनी पप्पू गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्याने अभिनंदन करण्यात आले.तसेच या निवडी दरम्यान व्यवस्थापन समिती मध्येसदस्यपदी संतोष प्रेमराज जाधव,संतोष दादा गवळी,सुनिल ताराचंद काळे,योगिता विशाल काळे ,लक्ष्मी मंगेश डोके,तज्ञ सदस्य दत्तात्रय तुकाराम काळे,ग्रामपंचायत प्रतिनिधी लीलाताई दिलीप काळे,मुख्याध्यापक सच्चिदानंद थेऊरकर यांची निवड करण्यात आली.या निवडी दरम्यानमाजी आदर्श सरपंच श्यामभाऊ काळे, शिवसेना नेते संतोष काळे, तंटामुक्ती उपाध्यक्ष नागेश काळे पत्रकार बापू जाधव,अविनाश रसाळ,बबन ढोरजकर, दत्तात्रय जाधव, जितेंद्र काळे,विनोद काळे,आबासाहेब थोरात,अमोल कांबळे,प्रताप थोरात,सतिष गव्हाणे, विनोद काळे, स्वप्निल काळे,योगिता विशाल थोरात व पालक वर्ग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमोणे शिक्षक व कर्मचारीवर्ग, विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकारी व सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक, समस्त-ग्रामस्थ, महिला पालक वर्ग उपस्थित होते या सर्वांनी सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.”शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांना अनेक भौतिक सुविधा आणि अभ्यासक्रम यासाठी चांगले काम करणार.पटसंख्या वाढविण्यासाठी तसेच परिसरातील शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार.शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी व गुणवत्ता सुधारणा यासाठी चर्चासत्र आणि संस्कार शिबीरांचे आयोजन करणार.”- अमोल थोरात (अध्यक्ष – शालेय व्यवस्थापन समिती निमोणे)