प्रतिनिधी : सचिन थोरवे
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर हांडे यांनी हा संघ चार मे 2004 रोजी स्थापन झाला असून आजपर्यंत संघामध्ये किमान 500 सभासद असल्याचे त्यांनी सांगितले संघाची मासिक सभा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला घेण्यात येते त्या महिन्यात ज्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस येतो त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या जातात आणि इतरही विषयांवर त्या ठिकाणी चर्चा होते बालपणीच्या काही आठवणी त्या ठिकाणी सांगतात त्याचप्रमाणे कुणाच्या काही अडचणी असेल तर त्यावेळी चर्चा होऊन त्यावर योग्य तो मार्ग देखील काढला जातो असे विविध उपक्रम जेष्ठ नागरिक या ठिकाणी घेतात आणि विशेष म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी भेटवस्तू देखील ज्येष्ठ नागरिकांना प्रदान करण्यात येतात
ज्येष्ठ नागरिक संघ यांची सभा चालू असताना त्या ठिकाणी अचानक उत्तर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कांडगे साहेब यांनी अचानक भेट दिली आणि त्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या बरोबर आदराने सुसंवाद साधला तब्येतीविषयी त्यांच्या संगती चर्चा केली आणि एवढेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनी आपण राहतो त्या घराचे दरवाजे सुरक्षित पाहिजे बँकेतून पैसे काढताना कुठलाही अनोखी माणसाची मदत घेऊ नका बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्या ज्येष्ठ नागरिक एकटे असाल तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्या असे त्यांनी यावेळी सांगितले कांडगे साहेबांच्या या आपुलकीमुळे ज्येष्ठ नागरिक काही काळ भारावून गेले यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक अतिशय उत्साही असल्याचे त्या ठिकाणी दिसून आले
संघटनेचे उपाध्यक्ष टी जी हांडे यांनी कार्यालयास भेट देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि त्यांच्या समवेत उपस्थित सहकाऱ्यांचे आभार मानले