जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
लायन्स क्लब ऑफ ओतूर तर्फे ऑक्टोबर सर्विस सप्ताह अंतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविल्याची माहिती क्लबच्या अध्यक्षा ला वैशाली हुले व लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ चे शाळा बालकल्याण चेअरपर्सन ला. विवेक पानसरे यांनी दिली.
खामुंडी गावामधील ग्रामीण समुदायासाठी आयोजित केलेल्या मोफत भव्य वैद्यकीय शिबिरामध्ये सामान्य आरोग्य तपासणी, मधुमेह रक्त तपासणी, आवश्यक औषधांचे वितरण, हाडांची घनता तपासणी, एक्यूप्रेशर आणि अॅक्युपंक्चर सेवा देण्यात आल्या शिबिरार्थींच्या चेहऱ्यावर कृतज्ञता आणि आराम पाहणे हृदयस्पर्शी होते त्यांचे स्मित हास्य,आशीर्वाद आणि मनापासून आभार हे लायन्सने केलेल्या सेवेचा पुरावा होता असे प्रतिपादन ला. डॉ सीमा शिंदे (पानसरे) यांनी केले.सर्व शिबिरार्थींना आग्रहाने स्वादिष्ट भोजन खाऊ घालण्यात आले.
भारतातील समृद्ध जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याची सखोल वाचनबध्दतेअंतर्गत ओतूरच्या गाडगे महाराज विद्यालयात व चैतन्य विद्यालयात ३०० रोपांची वनस्पती संग्रहालये स्थापना करण्यात आली. हा अनोखा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक मौल्यवान शैक्षणिक संसाधन आहे जो शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल भविष्यासाठी योगदानच आहे असे प्रतिपादन गाडगे महाराज विद्यालयाचे संचालक ला नितीन पाटील सरांनी उदघाटनसमारंभाप्रसंगी केले.
भूक आणि अन्न असुरक्षिततेचा सामना करणार्या डुंबरवाडी येथील गरीब गरजू लोकांच्या तात्काळ गरजा अंशतः पूर्ण करण्यासाठी राबविलेल्या अन्नदान उपक्रमास ला नामदेव पादीर, ला सुशीला डुंबरे, ला सुनील चांदवडकर, ला संतोष बोडके यांनी अर्थसहाय्य केले. दयाळूपणाची साधी कृती देखील गरजूंना सांत्वन, सन्मान आणि आशा देऊ शकते त्यादृष्टीने घोडेमाळ, डिंगोरे येथे लहान मुलांना प्रोटीन पावडर, मल्टीविटामिन सिरप, बी कॉम्प्लेक्स टॉनिक्स, लोह टॉनिक्सचे वाटप करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणात लहान व मोठ्या व्यक्तींसाठी नवीन व जुने कपडे वाटप मोहीम राबविण्यात आली. सामूहिक प्रयत्नांतुन वंचितांच्या जीवनात उबदारपणा आणणाऱ्या तसेच एकतेची भावना वाढविणाऱ्या उपक्रमास झोन चेअरपर्सन ला कल्पना मांजरे समवेत ला प्रकाशजी मुटके, ला वैशाली नायकोडी, ला शरद माळवे, ला कविता डुंबरे, ला विलास मांजरे, ला परदेशी, सौ मनीषा पाटील, श्री जालंदर उकिर्डे, श्री नंदुशेट भोर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ओतूरच्या श्री.महालक्ष्मी मंदिराजवळ आणि चैतन्य विद्यालय शाळेच्या सीमेवर ५-६ फूट उंचीच्या २५ झाडांचे वृक्षारोपण लिओ क्लब ऑफ ओतूरचे अध्यक्ष हर्षवर्धन डुंबरे, लिओ धनश्री डुंबरे, लिओ सानिका डुंबरे, ला शेखर कर्डिले, चैतन्य विद्यालय ओतूरचे माननीय मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर पानसरे सर, सौ. भालेकर मॅडम, हरित सेना प्रमुख दुडे सर, शिंदे सर, संजय डुंबरे सर, जमीन मालक संबुसजी यांच्या हस्ते करण्यात आले.