जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायती निवडणुकीचे बिगुल वाजले असताना पिंपळवंडी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.
पिंपळवंडी ग्रामपंचायत मध्ये बदल होणार का याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे गावातील काही मंडळी आपण निवडून आल्यानंतर काय काम करणार याची माहिती एका अहवालाद्वारे लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि मतदार राजाने आपल्यावरती विश्वास ठेवून मतदान करावे यासाठी जनजागृती करत आहेत दरम्यान काल गावामध्ये अचानक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि इच्छुक उमेदवारांची एका हॉटेलमध्ये चहा पाणी करून चर्चा करण्यात आली यावेळेस जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय शेठ भुजबळ तंटामुक्तीचे अध्यक्ष पिराजी शेठ टाकळकर शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित दादा वाघ प्रसिद्ध उद्योजक मयूर शेठ पवार मनोज पवार आणि अनेक मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ ग्रामस्थ ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये चर्चा करत असताना मागील निवडणुकीमध्ये कुणी कुणाला काय शब्द दिला किंवा पाठीमागच्या निवडणुकीत जे इच्छुक होते ते त्यावेळेस ज्यांच्या शब्दाखातर त्यांनी माघार घेतली त्यांना आता संधी द्यायची का अशीही चर्चा त्या ठिकाणी झाल्याचे समजते परंतु येथील जनता कोणाला कौल देणार निवडणूक होणार किंवा बिनविरोध होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.