जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर


ओतूर शहरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळांच्या देवीमुर्तींच्या आगमन मिरवणुकांनी अवघा परिसर दणाणून सोडला होता.ओतूरच्या श्री छत्रपती शिवाजी रोडवरील जय दुर्गाशक्ती नवरात्रोत्सव मंडळाने अत्यंत शिस्तबध्दपणे डी.जे.डॉल्बी विरहित, पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य आदर्शमिरवणुकीचे आयोजन केले होते.मिरवणुकीत मंडळातीलच मयुरी रसाळे व जुई पराड यांचे मार्गदर्शनात महिला व मुलींनी महिनाभर सराव करून तयार केलेल्या लेझीम पथकाने नेत्रदीपक केलेल्या कलाकृतीचे सादरीकरण पहाण्यासाठी भाविभक्तांनी मोठी गर्दी केली होती परिणामी हे महिलांचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले.
मंडळाने यावर्षी अत्यंत सुबक अशा भव्य व विलोभनीय रेणुकामातेच्या देवी मूर्तीची व घटस्थापना केली असून मोठा उभारलेला शामियाना व त्यावर केलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई देविभक्तांना थांबण्यास भाग पाडत आहे,मंडळाने दैनंदिन दोन्ही वेळची महाआरती,भजन,प्रवचन,देवीची गीते,होम हवन,मंगळा गौर, रासदांडिया,उखाणे स्पर्धा,होम मिनिस्टर,संगीत खुर्ची,हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक व जेष्ठ पत्रकार बापू रसाळे,अरुण देसाई, अमोल बोऱ्हाडे,अध्यक्ष राजेंद्र शेटे,उपाध्यक्ष अभिनव पाटील डुंबरे,नंदू गीते यांनी दिली.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button