प्रतिनिधी सचिन थोरवे
प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बुद्रुक तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बुद्रुक या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प घेण्यात आला
आयुष्यमान भारत कार्ड प्रत्येकाने काढावे हे कार्ड काढल्यानंतर प्रत्येक नागरिकाला त्याच्या फॅमिली साठी पाच लाख रुपये पर्यंतचा उपचाराचा खर्च सरकार करणारा असून त्यामध्ये १२०९ शस्त्रक्रियांचा समावेश येत असल्याचे शिरोली बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय जाधव यांनी सांगितले परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बुद्रुक या ठिकाणी मलेरिया निमोनिया डेंगू त्याचप्रमाणे औषध पिणाऱ्या व्यक्तीवरील उपचार या ठिकाणी करण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले
सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेले हे आरोग्य केंद्र असून या ठिकाणी आयपीडी ओपीडी तसेच लसीकरण सत्र आणि सर्व राष्ट्रीय प्रोग्राम राबवले जात आहे त्याचप्रमाणे संसर्गजन्य रोग त्याचे निदान व संसर्गजन्य रोग यांचे निदान व उपचार त्याचप्रमाणे माता व बालक यांच्या संबंधित असणारे सर्व आजारांचे निदान आणि उपचार या ठिकाणी करण्यात येत आहेत
आयुष्यमान भारत मोहीम सुरू झाल्यापासून या ठिकाणी 2264 कार्ड 18 स्वयंसेविका यांच्या मदतीने काढून दिल्याची माहिती डॉक्टर अक्षय जाधव यांनी दिली सद्यस्थितीत या ठिकाणी डॉक्टर वाघिरे चांगल्या प्रकारे रुग्णांना सेवा देत आहेत.