शिवजन्मभूमी जुन्नर चे आमदार अतुल शेठ बेनके यांच्या जनता दरबारात मुद्रांक विक्री संघटना निवेदन देताना.
जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे
जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुल शेठ बेनके हे महिन्यातून चार वेळा त्यांच्या कार्यालयात त्या ठिकाणी जनता दरबाराचे आयोजन गेले अनेक वर्षांपासून करत आहे
आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी त्यांच्या कार्यालय मध्ये हा जनता दरबार भरला असता तालुक्यातील अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन त्या ठिकाणी आले होते त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्या संघटनेने आमदार अतुल शेठ बेनके यांना निवेदन दिले त्यांनी निवेदनात महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शंभर आणि पाचशे रुपयाचे मुद्रांक व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय घेतला असून बँकेतून फ्रॅंकिंग करून स्टॅम्प विक्री करण्याचा सरकारचा मानस आहे सरकारच्या या निर्णयामुळे सध्याचे महाराष्ट्रातील अधिकृत मुद्रांक विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते हे सर्व स्टॅम्प विक्रेते 50 या वयोगटातील असल्यामुळे त्यांना दुसरा व्यवसाय करणे अशक्य आहे त्यामुळे सरकारने आमची व्यथा ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा असे जुन्नर तालुका अधिकृत मुद्रांक विक्रेता संघटनेचे सदस्य राजेंद्र खत्री जंगम ढोबळे आणि अमर शेठ गुंजाळ आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी हे निवेदन आमदार बेनके यांना दिले त्याचप्रमाणे आदिवासी भागातील काही संघटनेने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार अतुल शेठ बेनके यांना निवेदन दिले असता आमदारांनी तत्काळ संबंधित विभागाशी चर्चा करून त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला त्याबद्दल त्यांच्याकडूनही आमदार अतुल शेठ बेनके यांचे कौतुक होत आहे
तालुक्यातील नागरिक आमदार यांच्याकडे काहीतरी आशेने येत असताना त्यांची निराशा त्या ठिकाणी नक्कीच होत नाही ज्यांची ज्या ज्या विभागाची संबंधित कामे त्यांच्याकडे नागरिक घेऊन येतात त्या सर्वांना लगेचच त्या ठिकाणी आमदार साहेब फोनवरून त्यांच्याशी संपर्क करून त्यांचे काम मार्गी लावूनच देतात हा प्रत्यक्ष अनुभव काल त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी सांगितला
जनता दरबार चालू असताना दौंड चे आमदार राहुल कुल यांनी शिवजन्मभूमी जुन्नर चे आमदार अतुल शेठ बेनके यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना चहापाणी करून अतुल शेठ या ठिकाणी तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लगेचच जनता दरबारात परतले .