ओतूर येथे श्रीकृष्ण भूषण पुरस्काराचे वितरण.)

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर


१९७० च्या दशकातील स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ यांचे त्यागवृत्ती राजकिय नेते व नव्या पिढीला मार्गदर्शक आणि दिशादर्शक असल्याचे उदगार शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी श्रीकृष्ण तांबे भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर सत्काराला उत्तर देताना ओतूर येथील चैतन्य विद्यालयातील पुरस्कार कार्यक्रमात काढले.
स्व.आमदार श्रीकृष्ण तांबे तथा झांबरशेठ यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने श्रीकृष्ण भूषण पुरस्कार त्याचप्रमाणे जुन्नरच्या पहिल्या महिला आमदार स्व.श्रीमती लतानानी श्रीकृष्ण तांबे भूषण पुरस्काराचे वितरणप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले होते.याच वेळी पहिल्या महिला माजी आमदार स्व.श्रीमती लताबाई तांबे भूषण पुरस्कार हा निर्मिती फाउंडेशन लोणावळाच्या संस्थापक आजीवन अध्यक्ष आणि पद्मावती नर्सिंग होमच्या सर्वेसर्वा डॉ.सीमा शिंदे- पानसरे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, ‘विघ्नहर’चे संचालक धनंजय डुंबरे,वासुदेव जोरी,सोपानराव भाकरे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे,प्रभाकर तांबे,विनायक तांबे, निर्मला पानसरे,सुदाम घोलप,जाईबाई गावडे,राजेंद्र डुंबरे,रघुनाथ तांबे,पंकज घोलप,वैभव तांबे,सर्जेराव गाढवे,विलास दांगट,रंगनाथ घोलप,राजेंद्र गावडे, नितीन पाटील,सुनिता गावडे,मनीषा गावडे,बळीराम ढोमे,संपत पानमंद,संजय बारहाते,रमेश डुंबरे,सुजाता कुलकर्णी,महादेव ओतुरकर,विवेक पानसरे,प्रभाकर खोमणे,रतन गावडे,माधवराव डुंबरे,चांदा गावडे, जी. आर.डुंबरे,बिपिन थिटे,विशाल तांबे,गीता पानसरे, सावकार पिंगट,प्रभाकर शिंदे,सचिन आंबडेकर,डॉ.हिरामण चोरे याशिवाय डॉ. सीमा शिंदे यांचे बॉर्डरलेस पँथर्स या व्हाट्सएप ग्रुपचे अनेक सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दोन्ही मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन श्रीकृष्ण भूषण पुरस्कार समितीचे कार्यवाह भाऊसाहेब खाडे यांनी केले. सचिव प्रदीप गाढवे यांनी प्रास्ताविक केले तर सरपंच प्रशांत डुंबरे यांनी आभार मानले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button