जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील ओतूर जवळील अहिनवेवाडी येथील एक तरूण गेली काही महिन्यांपासून बेपत्ता होता.सदरचा तरूण हा सुमारे ५०० ते ६०० किलो- मीटर अंतरावर गोवा राज्यात असल्याचे सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून समजताच त्याचे नातेवाईक व अहिनवेवाडीचे सरपंच:-भीमाबाई खंडागळे,उपसरपंच:-स्वप्निल अहिनवे तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी महाराष्ट्रातील त्याच्या मूळ गावी सुखरूप आणल्याने सदर युवका- च्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
अहिनवेवाडी ( ता. जुन्नर ) गावातील आदिवासी कुटुंबातील गणेश खंडागळे हा युवक गेली कित्येक दिवस घरातून बेपत्ता होता. चार दिवसापूर्वी तो गोवा येथे असल्याचे ओतूर येथील रहिवासी व सध्या कामानिमित्त गोवा राज्यात असलेले अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे अधिकारी सामाजिक कार्यकर्ते पोपट भिमाजी नलावडे यांना एका व्हाट्सअप ग्रुपच्या मेसेज मुळे समजले.नलावडे हे कामानिमित्त गोवा राज्यात असल्याने व आपल्या गावातील एक युवक पाहून नलावडे यांनी त्यांना मदत करावयाचे ठरवले.तो म्हापूसा पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे संबंधित अधिकारी यांना सांगुन तुम्ही त्याला शोधायला मदत करा.मग त्यांनी पोलीस स्टेशनच्या व्हॉट्सअप ग्रुपवर गणेशचा फोटो टाकला.त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील त्याची शोधाशोध केली.दुपारी एक वाजता गणेश एका पुलाखाली झोपलेला त्यांना आढळला.मग नलावडे यांना पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला की, तुमचा माणूस भेटला आहे.
नलावडे यांनी तात्काळ स्वप्निल अहिनवे यांना कॉल करून फोटो पाठवला. त्यांनी सांगितले की, हा गणेशच आहे. त्याची ओळख पटवून खात्री केल्यानंतर त्यांनी गणेशच्या भावाला सोबत घेऊन नलावडे यांना कॉल करून सांगितले आम्ही उद्या सोमवारी त्याला घ्यायला गोव्याला येतो असे सांगीतले मोपा पोलीस स्टेशनला फोटो देऊन पुढे आल्यावर मोपा पोलीस स्टेशनचे पीआय निनाद यांचा कॉल आला की फोटोत असणारी व्यक्ती सोमवारी गोवा बॉर्डर पास करून बांदा सावंतवाडी येथे गेल्याचे काही लोकांनी पाहिले आहे.मग तात्काळ बांदा येथील नलावडे यांचे मित्र साई राणे यांना कॉल करून तेथील व्हाट्सअप ग्रुपवर गणेशचा फोटो टाकायला सांगितले.लगेच अर्धातासात कॉल आला की,दुपारी गणेश हा इन्सुरली चेक पोस्ट जवळून चालत जाताना दिसला आहे.त्यानंतर नलावडे व सर्वजण त्या ठिकाणी गेले,स्वप्निल व नितीन यांना पाहून गणेशच्या चेहऱ्यावर हासू आले ते पाहून गणेशच्या सख्या भावासह सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.गणेशने सर्वांना ओळखले होते.