जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत ही जनतेची इच्छा असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.शिरूर लोकसभा प्रवास’ योजनांतर्गत महाविजय २०२४ अंतर्गत “घर चलो” अभियान कार्यक्रमातर्गत बावनकुळे गुरुवारी दि:-१२ नारायणगाव येथे आले होते. यावेळी ६०० नेते व ६०० वॉरियर्स यांना मार्गदर्शन केले.बारामतीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सर्व जागा महायुतीतील उमेदवार ५१ टक्के मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे,आमदार राहुल कुल,माजी मंत्री बाळा भेगडे,सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे,प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे,धर्मेंद्र खाणरे,जयश्री पलांडे,डॉ.ताराचंद कराळे,आशा बुचके,संतोष खैरे, आशिष माळवदकर,अॅड. राजेंद्र कोल्हे,शरद दरेकर, अक्षय खैर, अक्षय डोके, अमित औटी, माया डोंगरे, सविता गायकवाड,संगीता वाघ,साहेबराव तांबोळी, पंडित मेमाणे,महेंद्र सदाकाळ,दिलीप गांजाळे,अमोल भुजबळ उपस्थित होते
चंद्रशेखर बावनकुळे यांचे नारायणगाव नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले.आदिवासी महिलांचे लेझीम पथक,पारंपरीक वाद्य,आदिवासी तरुण पारंपारीक पेहराव करून मिरवणुकीत सहभागी झाले
होते. विश्वकर्मा योजना केंद्राने राबविल्याबद्दल बारा बलुतेदार व्यवसायिकानी आपल्या व्यवसायाचे प्रदर्शन मांडले होते मोदी सरकारने ही योजना राबविण्यात पुढाकार घेतला त्यामुळे बाराबलुतेदार व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले.
-: जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या:-
बसस्थानक चौकातील स्व.विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बावनकुळे यांनी पायी चालत नागरिक व व्यावसायिकांशी संवाद साधला.मोदी यांच्या ९ वर्षाच्या कारकिर्दीबद्दल जनतेला काय वाटते; या बाबत त्यांचे मत जाणून घेत असताना मोदींच्या कामावर खुश असल्याचे लोकांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष माळवदकर यांनी केले तर आभार शरद दरेकर यांनी मानले.
” उद्धव ठाकरे यानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही.परंतु ठाकरे यांना आता कोणी विचारत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत देशाचे कणखरपणे नेतृत्व केले असून; २०२४ ला देशाचे पंतप्रधान मोदीच असावेत असा सगळ्यांचा सूर आहे.अजित पवार यांनी जगाचे नेतृत्व करण्याची धमक फक्त नरेंद्र मोदी यांच्यात असल्याचे कबूल केले आहे आणि शरद पवार आपला पक्ष कुठे उरलाय का हे शोधत फिरत आहेत. :-चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष,भाजपा””