शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
भांबर्डे (ता शिरूर) येथे नवजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था व पंचशील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे व्यवस्थापिका सुमन साळवे यांनी आरोग्य विषयी माहिती देताना सांगितले की निरोगी आरोग्य व साधारण महत्त्वाचे आहे आरोग्य चांगले असल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा तसेच समाजाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते आजारी पडल्यास उपचार करीत बसण्यासाठी वेळ व पैसा खर्च होत राहतो याचा मानसिक ताण स्वतःवर तसेच कुटुंबावरही पडत असतो त्यामुळे नेहमी निरोगी राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आरोग्य निरोगी राहावे यासाठी सर्वप्रथम आरोग्य विषयी सामान्य गाव पातळीवर शिबिरे आयोजित करणे सर्व ग्रामस्थांना आरोग्य विषयी ज्ञान संपादन करणे आरोग्याची माहिती देणे प्रमुख आजारांची माहिती देणे शारीरिक मानसिक सामाजिक दृष्टीने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजे आरोग्य होय.
जागतिक आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसून ती एक शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
युवा नेते स्वप्निल वीर व सर्व युवकांनी यामध्ये प्रतिसाद दिला व आरोग्य विषयी जनजागृती केली सर्व वयोगटातील ग्रामस्थांनी या शिबिराचा फायदा घेतला त्यामध्ये डोळे तपासणी मोतीबिंदू तपासणी मणक्याचे आजार थंडी ताप बीपी शुगर तपासणी डोकेदुखी ताप सर्दी खोकला अंगदुखी त्वचेचे आजार पोटांचे विकार मणक्याचे आजार अशा सर्व आजारांवर मोफत औषध वाटप करण्यात आले गुडघेदुखी कंबर दुखी सांधेवात हात पाय दुखणे मान दुखी व सर्व आजारांचा आयुर्वेदिक थेरपी मोफत करण्यात आली.
यामध्ये हजार रुपयांची चष्मे दोनशे रुपयात वाटप करण्यात आले. २५० ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी माजी उपसरपंच सुनील वीर,माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष वीर,चेअरमन भानुदास वीर, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अविनाश वीर, ग्रामपंचायत सदस्य अलका पिंगळे, शिवाजी वीर,नवनाथ वीर, सुरज वीर , सुहास वीर, भरत वीर, नामदेव पवार, दिलीप मस्के.सदाशिव थोरात, दादा पिंगळे ,गंगाराम वीर, त्रिंबक वीर, माणिक वीर, विठ्ठल वीर, आदी ग्रामस्थ बहुसंख्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुमन ताई साळवे,आशाताई वाळके व नवयुवक तरुण मित्र मंडळ वीर वस्ती भांबर्डे तसेच ग्रामस्थ भांबर्डे यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल वीर यांनी केले तसेच आभार माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष वीर यांनी मानले.