शुभम वाकचौरे
शिरूर तालुक्यातील फाकटे गावात सुरू असलेले उपोषण हे मागे अखेर घेण्यात आले आहे.फाकटे, वडेर खुर्द, चांडोह, या रस्त्याच्या दुर्दशेमुळे तरुणांनी आमरण उपोषणाचे अस्र उगारले होते. या मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. ही आग्रही मागणी या तरुणांची होती .अनेक वेळा पाठपुरावा करून ही विकास कामांबाबत कोणताच निर्णय होत नव्हता. या रस्त्याचा मुख्य प्रश्न सुटत नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या रस्त्याबाबत विकास कामे झाली नाही. तर जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही देण्यात आलेला होता. या उपोषणामध्ये सामाजिक कार्यकर्ते नितीन पिंगळे,ग्रामपंचायत सदस्य पवन वाळुंज, माजी उपसरपंच मनीष बोऱ्हाडे यांचा या उपोषणाला मुख्य सहभाग होता.
फाकटे, वडनेर खुर्द आणि चांडोह या रस्त्यांच्या मागणीबरोबरच गेली अनेक दिवसांपासून रुंदीकरणासाठी व डांबरीकरणासाठी प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याचे सद्या मुरमीकरण करण्यात येणार आहे. सद्या ज्या ठिकाणी पाणी साचत आहे. व ज्या ठिकाणी खड्डे आहे. अश्या ठिकाणी मुरमीकरण केले जाणार आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत रस्त्याची विकास कामे होणार आहे. या विकास कामांसाठी लागणारा निधी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती देवदत्त निकम या सर्वांच्या माध्यमातून निधी हा उपलब्ध करून दिला जाणार. असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नितीन पिंगळे यांनी सांगितले आहे.
या आमरण उपोषणा प्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम ,माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सरपंच अरुणा घोडे , माजी संचालक राजेंद्र गावडे, बिपिन थिटे , माऊली ढोमे,यांनी उपोषणस्थळी येऊन भेटी दिल्या.अनेक ग्रामस्थ, संघटना व पदाधिकारी यांनी या उपोषणाला पाठींबा दर्शविला होता.
फाकटे, वडनेर खुर्द, चांडोह या रस्त्यांची पुढील विकास कामे कश्या प्रकारे करायला पाहिजे. ग्रामस्थ मंडळी व उपोषणकर्ते या सर्वांची भेट व्हावी म्हणून. सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी रविवार ता: २४ रोजी बैठक बोलवली आहे. या बैठकीत विकास कामांबद्दल सर्व निर्णय घेतले जाणार आहे. सामजिक कार्यकर्ते- नितीन पिंगळे