निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
शिरूर तालुक्यातील कारेगाव निमोणे गोलेगाव न्हावरे अशा अनेक गावांचा दौऱ्यात समावेश होता तालुक्यातील अनेक गावांतील विकासकामांचा आढावा घेतला.शासनाच्या व पक्षाच्या वतीने अनेक गावांतील विकासकामांना निधी दिला जाईल अशी ग्वाही राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली. गोलेगाव येथील शहिद स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .गोलेगाव ग्रामपंचायतच्या वतीने विकास कामासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी त्यांना करण्यात आली.
यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्या साठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभे करा. नाविन्यपूर्ण अभ्यासिका इमारतीसाठी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून देतो. असे यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले. गोलेगाव याठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत महादेव जानकर व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनायक रूपनर उपाध्यक्ष राजू पुणेकर तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे तालुका महिला अध्यक्षा चेतना पिंगळे शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते उपाध्यक्षा सपना मलंगुडे वाल्मिक करे भिमराव करे नितीन धरणे उपसरपंच निलेश बांदल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मच्छिंद्र कारंडे शिवाजी विद्यालय शिक्षक मच्छिंद्र गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग बांदल माजी सैनिक सुरेश पडवळ अनिल भोगावडे ज्ञानदेव कारंडे योगेश इंगळे व ग्रामस्थ उपस्थित होते.