जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
जुन्नर आंबेगावच्या शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची शेती प्रश्न विषयी घेतली भेट.
शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना कांदा आणि टोमॅटो बाबतीत निवेदन दिले.
पुणे या ठिकाणी कौन्सिल हॉल मध्ये महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपराव वळसे पाटील यांना कांदा आणि टोमॅटो मालाला बाजार भाव मिळत नसल्यामुळे टोमॅटो रस्त्यावरती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे सध्याच्या बाजारभावात शेतकऱ्यांना तोडणी आणि वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्ये सारखे पाऊल उचलू शकतो व असे प्रकार घडू नये म्हणून केंद्र सरकारने टोमॅटो किमान 30 रुपये किलोने खरेदी करावी.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल जे अनुदान जाहीर केले आहे त्यातील फार कमी प्रमाणात शेतकऱ्यांना ते अनुदान मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान लवकरात लवकर त्यांना मिळावे अशी मागणी उपस्थित सर्वांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून देवदत्त निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्याकडे त्यावर अजितदादा यांनी लगेचच पणन अधीक्षक यांना फोन करून रखडलेल्या अनुदानाची माहिती घेऊन ते लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्याची सूचना देखील त्यांनी लगेच केली यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके यांनी मी शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे देखील सांगितले.
महाराष्ट्रात कांदा असताना देखील केंद्र सरकार अफगाणिस्तान या ठिकाणावरून कांदा आयात करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहे हे काल पुणे या ठिकाणी भेटून सविस्तर चर्चा केली आणि यावर योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती देखील त्या ठिकाणी जुन्नर चे आमदार अतुल शेठ बेनके आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विद्यमान संचालक देवदत्त निकम साहेब त्याचप्रमाणे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली शेठ खंडागळे जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे सचिन थोरवे प्रमोद खांडगे शेतकरी संदेश खंडागळे विशाल वाबळे सुदाम काळे बढेकर या सर्वांनी केली यावर योग्य निर्णय न झाल्यास मंत्रालयावरती कांदे आणि टोमॅटो घेऊन मोर्चा काढणार असल्याचे देवदत्त जी निकम साहेब यांनी प्रत्यक्ष आणि निवेदनाद्वारे सूचित केले आहे.