निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
शिव शंभो शंकरा,हर हर महादेव श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आज शिव शंभो भीमाशंकर महादेव मंदिर भीमा नदीतीरी आलेगाव पागा या ठिकाणी प्रसिद्ध अशा महादेव मंदिरात भक्ताला पावणाऱ्या या मंदिरामध्ये श्रावण मास महिन्यामध्ये एका महिनाभर खूप गर्दी होती
तसेच आज सोमवार निमित्ताने योगेश भोसले सौ नम्रता भोसले यांनी मोठ्या भक्ती भावाने महादेव मंदिराची सजावट करण्यात आली झेंडू, आस्टर, जास्वंद, गुलाब, जाई जुई, आणि धोत्र्याची फुले अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी संपूर्ण मंदिर आतील गाभारा पिंड सजवण्यात आली दर्शनासाठी दररोज खूप गर्दी असते या सजावटीचे कौतुक सर्व शेतकरी व नागरिकांनी केले आहे.
शिवशंभो महादेवाची पिंड ही शिवकालीन आहे मध्यंतरी काही दिवसांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करून बांधकाम करण्यात आले आहे लोकवर्गणीतून हे मंदिर सभा मंडप कळस असे बांधकाम करण्यात आले आहे हे मंदिर पुरातन पेशवेकालीन असून पुरातन पिंड तसीच आहे यासाठी आलेगाव पागा वाड्यावर त्यावरील व इतर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात नवसाला पावणारे हे महादेव मंदिर आहे अनेक भक्तांना हे पावले आहे अशा मंदिरासाठी दर्शनासाठी आज खूप गर्दी होती .
याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये योगेश भोसले सौ नम्रता भोसले, नागेश भोसले, रेखाताई भोसले , शरदराव रासकर संपर्क प्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा, अमोल भोसले उपाध्यक्ष ब्रिजवासी गोरक्षक, वसंत भोसले, दत्तात्रय भोसले ,कु शौर्य भोसले, ऋतुजा भोसले , ओंकार काकडे आदी भावीक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशी माहिती शरदराव रासकर संपर्क प्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा, संचालक संभाजी वि का सो सेवा संस्था यांनी दिली आहे.