शिरूर (जि. पुणे) – “शिक्षण हाच सर्वोत्तम अधिकार” या उद्देशाने कार्यरत असलेल्या आशेचे द्वार प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने १६ जून २०२५ रोजी शिरूर नगरपालिका शाळा क्रमांक १ येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा ३० गरजू विद्यार्थ्यांना लाभ झाला.या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे स्वयसेवक फ्रान्सिस बापूराव महांकाळे यांनी केले होते. कार्यक्रमाचे पर्यवेक्षण रघुनाथ हुंबरे यांनी केले.या उपक्रमात अध्यक्ष सर जोसफ पवार, खजिनदार सर प्रशांत खवाडिया, सचिव सर सचिन जाधव, प्रकल्प संचालक सर प्रदीप लोण्डे, स्वयंसेवक दिपक क्षेत्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या सामाजिक उपक्रमामधून शिक्षण क्षेत्रात मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा मानस संस्थेचा आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका उषा वेताळ व वर्गशिक्षकांनी संस्थेचे आभार मानून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.