शुभम वाकचौरे

बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर शहर सचिव सागर घोलप व शहर संघटक अशोक गुळादे यांनी शिरूर नगरपरिषदेस ६ जुन रोजी शहरातील सर्व खड्डे बुजवण्यात यावेत अन्यथा १८ जून रोजी भिक मागो आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र दिले होते.त्या पत्राची तात्काळ दखल घेऊन शिरूर नगरपरिषद यांनी ११ जून ला शहरातील मोठ्या खड्डांत MPM केले परंतु सदर काम तोंडाला पाणी पुसण्यासारखे झाल्याचे संपूर्ण शिरूर शहरात चर्चा चालू झाली.याची गंभीर दखल बहुजन मुक्ती पार्टी ने घेऊन याची पोल खोल केली.

त्यानंतर शिरूर नगरपरिषदेचे अधिकारी यांनी १७ जून ला बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकारी यांना लेखी पत्र देऊन सदर कामे हे उत्तम दर्जाचे करण्यात यावे अशी सक्त ताकीद ठेकेदाराला देण्यात आल्याचे सांगितले.तसेच ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्या जागेवर तात्काळ BC ने बुजविण्यात येतील असे लेखी स्वरूपात पत्र दिले आहे.हल्दीमोहला (दशक्रिया घाटला जाणारा रोड) सदर रोडचे पाच- सहा महिन्यांत काम मार्गी लागून त्या रस्ताचे रूंदीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.जोशीवाडी येथील TVS शोरूमच्या पुढील नाल्यावरील पडलेला पुल तात्काळ दुरूस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

शिरूर नगरपरिषद अधिकारी यांनी शहरातील कामे करताना कोणतीही हलगर्जी या पुढे होणार नाही व सर्व कामे वेळेवर होतील हे चर्चेदरम्यान ठरले, त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टी कडून १८ जून रोजी करण्यात येणारे भिक मागो आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button