प्रतिनिधी = बाळासाहेब जाधव
सरदवाडी येथे मंगळवार दिनांक 8/04/2025 रोजी हिवर मळा येथे दुपारच्या सुमारास आग लागली. सरदवाडी ग्रामपंचायत सदस्य विद्याताई सरोदे यांच्या ही बाब लक्षात आली असता त्यांनी सर्वप्रथम सरदवाडी गावच्या सरपंच लक्ष्मीताई बाळासाहेब जाधव यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली. सरपंच यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी अग्निशामक विभाग अधिकारी श्री गुंड साहेब यांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. गुंड साहेब यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच अग्निशामक विभागाचे अधिकारी पाठवले.यामध्ये अग्निशामक विमोचक श्री एस. एस.गावडे,यंत्रचालक श्री एस.आर. गायकवाड श्री नागरगोजे एस.आर.यादव यांच्या टीमने आग आटोक्यात आणली.घटनास्थळी आगीचे उंचच्या उंच लोट पसरले होते. अग्निशामक पथक वेळेवर आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. असे सरदवाडी गावचे माजी उपसरपंच गणेश सरोदे यांनी सांगितले.घटनास्थळी सरपंच लक्ष्मीताई बाळासाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य उमेश सरोदे, विद्याताई सरोदे, स्थानिक शेतकरी सुभाष सरोदे,मनोहर सरोदे ,धनु सरोदे,सोपान सरोदे उपस्थित होते