जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जुन्नर तालुका उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर,ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या उपस्थितीत येथील ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची तसेच पोलिस पाटील यांची बैठक ओतूर क्रीडा संकुल येथे शनिवार दि:- ०९ सप्टेंबर रोजी घेण्यात आली.येणारा गणेशोत्सव सण शांततेत व नियमात राहून साजरा करावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी जुन्नर उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर,ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे,ओतूर गावचे सरपंच प्रशांत डुंबरे,माजी उपसरपंच प्रेमानंद आस्वर, पीएसआय अनिल केरुलकर, महेश पठारे,रोहित बोंबले, विविध गावचे गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,पदाधिकारी,सदस्य, पोलिस पाटील उपस्थित होते.
अडचणींवर मार्ग काढू – पारंपरिक वाद्य वापरून गणेशोत्सव उत्साहात साजरा करा,सण आनंदाने साजरा करण्यासाठी दुसऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची असते आनंदाच्या क्षणाचे त्रासात होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आयुष्यात सूचनांचे पालन करून सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सवाचा आनंद घ्या.चुकूनही गालबोट लागेल, असे वर्तन करू नका अन्यथा पोलिसांना कारवाई करावी लागेल.सर्वांनी एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करा.अडीअडचणी समजून घेतल्यावर आपण अडचणीवर मार्ग काढू तसेच नदी-नाल्यांमध्ये विसर्जन करताना सर्वांनी खबरदारी व काळजी घ्या.आगमनाची व विसर्जन मिरवणूक व्यवस्थित पूर्ण करावी, असे ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी सांगितले.