निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने शनिवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी पुणे येथेसर्व जातीय धर्मीय वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .तसेच समाज हितासाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी ‘समाज भूषण पुरस्कार ‘ देऊन गौरव करण्यात येणार आहे .तरी इच्छुक वधूवरांसह पालकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ .अमरजी चौरे तसेच शिरूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे .
माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने शनिवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते चार या दरम्यान सर्व जातीय धर्मीय वधू वर परिचय मेळाव्याचेआयोजन करण्यात आले आहे .सकाळी १०.०० वा .ते सायंकाळी ४ .०० वा . या दरम्यान हा मेळावा संपन्न होत आहे .भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन , मालधक्का चौक , पुणे येथे हा मेळावा संपन्न होणार आहे .
या मेळाव्याचे उद्घाटन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष ऍड. रूपाली ठोंबरे , ज्येष्ठ पॅंथर नेते गंगाधर आंबेडकर ,पॅंथर नेते काकासाहेब खंबाळकर , रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ भेंडे , यांच्या शुभ हस्ते होणार आहे .माता रमाई यांच्या भूमिका साकार करणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील व अभिनेत्री आरोही शिवरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
या मेळाव्यामध्ये सर्व वयोगटातील ‘ सर्व जातीय -धर्मीय शिक्षित -उच्चशिक्षित , नोकरी ,व्यवसाय करणारे वधू वर उपस्थित राहणार आहेत . आपल्या पाल्यांना अनुरूप जीवनसाथी मिळण्याची सुवर्णसंधी या परिचय मेळाव्यातुन मिळणार असुन पालकांनी आपल्या पाल्यांसह उपस्थित रहावे , असे आवाहन आयोजकांकडुन करण्यात आले आहे .
त्याचप्रमाणे राजकिय , सामाजिक , शिक्षण , शेती , सहकार , पत्रकारिता अशा विविध माध्यमातून निरपेक्ष पणे समाजपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘ ‘समाज गौरव पुरस्कार ‘ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे . त्यामुळे जास्तीत जास्त बांधवांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन फाउंडेशन ट्रस्टचे पुणे जिल्हा अध्यक्ष मंगलताई चौरे , महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निलेश चौधरी कार्याध्यक्ष संतोष भालेराव पुणे शहराध्यक्ष अजय आहिरे महिला अध्यक्ष पुणे शहर रेणुका सुपेकर सुमन जैस्वाल युवती पुणे अध्यक्ष यांसह पदाधिका त्यांनी केले आहे .