शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ म्हाडा बोर्डाचे अध्यक्ष तथा माजी खासदार राज्यमंत्री शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मौजे लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डायनालॉग इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अक्षय आढळराव पाटील यांनी माहिती दिली आहे . ज्यांच्या पुढाकाराने मराठमोळा रांगडा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आवडीचा बैलगाडा शर्यत खेळ हा पुन्हा सुरू होण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला.2004 ते 2014 शिरूर लोकसभेतून लोकसभेचे खासदार पद ज्यांनी भूषविले.
तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि उपनेते पदाचा मान ज्यांना मिळाला. असे कर्तुत्वन नेतृत्व म्हणजेराज्यमंत्री /अध्यक्ष पुणे ग्रामीण क्षेत्र विकास मंडळ, आणि शिरूर लोकसभेचे माजी खासदार म्हणून जनमानसाच्या मनामनातील, हजारो लोकांच्या समस्या प्रत्येक रविवारी जनता दरबाराच्या माध्यमातून समस्या सोडवणारे जनमाणसांचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा वाढदिवस आज लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे मोठ्या दिमागदार पणे साजरा करण्यात येणार आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी देखील शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठान, डायनालॉग इंडिया लिमिटेड ,भैरवनाथ सहकारी पतसंस्था व श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य प्रमाणात आयोजन केले आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील रसिकांसाठी नृत्य, गायन, विनोदाची मेजवानी या निमित्ताने असणार आहे. गायक रोहित राऊत ,चेतन लोखंडे यांच्या सुमधुर आवाजाने आज लांडेवाडीतील आज लांडेवाडीतील रसिक आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मित्रपरिवार मंत्रमुग्ध होईल .’चला हवा येऊ द्या” फेम अभिनेता भाऊ कदम ,भारत गणेशपुरे, तसेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” फेम अभिनेत्री शिवाली परब, अभिनेता पृथ्वीक प्रताप यांची चुनूक आज आपणास लांडेवाडीत दिसणार आहे. याशिवाय सोबतीला अभिनेत्री मानसी नाईक यांच्या नृत्याचा आविष्कार रसिक अनुभवणार आहेत.
या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आमदार ज्ञानेश्वर कटके ,माजी आमदार अतुल बेनके, पोपटराव गावडे ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर ,शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे तसेच शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मित्रपरिवार सुनील बाणखेले माजी सरपंच, शिवाजीराजे राजगुरू आद्यगुरु लहुजी साळवे स्मारक शासन समिती महाराष्ट्र राज्य, रवींद्र करंजखेले पंचायत समिती माजी सदस्य शशी बाणखेले पंचायत समिती माजी सदस्य, काशिनाथ आल्हाट लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार्थी. उपस्थित राहणार आहेत. याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनासाठी शिरूर लोकसभेतील नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
असे आवाहन डायनालॉग इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अक्षय आढळराव पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा ,भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अपूर्व आढळराव पाटील यांनी केले आहे.